युवा क्रिकेटपटू लखपती


चेन्नई : आयपीएलच्या आठव्या हंगामासाठीच्या लिलावात यंदाही अनेक युवा क्रिकेटपटू लखपती झाले. मुंबईच्या सर्फराज खानला ५० लाख, सावंतवाडीच्या निखिल नाईकला ३० लाख, नागपूरच्या अक्षय वाखरे आणि मुंबईच्या दिनेश साळुंखेला प्रत्येकी १० लाखाची बोली लागली. १७ वर्षीय सर्फराज खानला बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने करारबद्ध केले. निखिल हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडे गेला. तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. ऑफस्पिनर अक्षय वाखरेला मुंबई इंडियन्सने १० लाखांना करारबद्ध केले आहे. अक्षय विदर्भचे प्रतिनिधित्व करतो.
मुंबईचा ३२ वर्षीय लेगस्पिनर दिनेश साळुंखेला राजस्थान रॉयल्सने १० लाखांची बोली लावली. २००८ मध्ये आयपीएलचे पहिलेवहिले जेतेपद पटकवलेल्या राजस्थान संघात दिनेश होता. एकही प्रथमश्रेणी लढत न खेळलेला २० वर्षीय के.सी. करिअप्पावर (२.४ कोटी) कोलकाता नाईट रायडर्सने विश्वास दाखवला. ज्‍याचे निर्धारीत मूल्‍य १० लाख रुपये होते. मात्र, कोलकाता नाइट रायडर्सने त्‍याला २.४ कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले.आठ पैकी सहा संघमालकांनी त्‍यांच्‍याकडे पाहिलेसुध्‍दा नव्‍हते.
झहीर खान आणि इरफान पठाण या डावखु-या मध्यमगती गोलंदाजांना बोली लागली, मात्र रडत कढत. दुखापतीमुळे देशांतर्गत क्रिकेटही न खेळणारा झहीर खानला दिल्ली डेअरडेव्हिल्सने चार कोटींना करारबद्ध केले. अष्टपैलू इरफान पठाणलाही दुस-या सत्रात त्याला चेन्नई सुपर किंग्जने १.५ कोटींना करारबद्ध केले.
आयपीएलच्या आठव्या आवृत्तीतील क्रिकेटपटूंच्या लिलावात एकूण ३४३ क्रिकेटपटूंचा समावेश होता. त्यापैकी ६७ क्रिकेटपटूंनाच बोली लागली. त्यात भारताच्या ४० तसेच परदेशातील २३ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. लिलावासाठी सर्व संघांनी एकूण ८७.६ कोटी खर्च केले. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमलासह कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान आणि माहेला जयवर्धने या श्रीलंकेच्या त्रिकुटालाही करारबद्ध करण्यात कुणीही उत्साह दाखवला नाही. कसोटीपटू चेतेश्वर पुजारालाही ‘अनसोल्ड’ ठरला.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)