आदर्श क्रिकेट संघ विजयी

19-02-2015 : 08:38:18
     528 Views

वडवणी! सोमनाथ खताळ
वडवणी तालुक्यातील मैंदा येथे तालुकास्तरीय खुल्या टेनीस बॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण २२ संघांनी सहभाग नोंदवला अंतीम सामना आदर्श क्रिकेट क्लब तर बिचकुलदार तांडा येथील जय सेवालाल क्रिकेट क्लब या दोन संघामध्ये झाला. यावेळी आदर्श क्रिकेट संघाने मोठ्या फरकाने विजय संपादन केला.
मैंदा येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी तालुक्यातील नावाजलेले २२ संघ सहभागी झाले होते.स्पर्धेची प्रत्येक लढत ही अटी तटीची झाली.अंतीम सामना हा जय सेवालाल क्रिकेट कल्ब आणि आदर्श क्रिकेट कल्ब यांच्यामध्ये झाला.हा अंतीम सामना रोमहर्षक झाला.हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते.
यावेळी नंदू चोरमले कर्णधार शिवाजी आजबे,संतोष आजबे,सचिन आजबे,दामोदर तांदळे,सतिष बडे,सत्यप्रेमी बडे,प्रकाश चव्हाण,तानाजी चोरमले,गणेश चोरमले,बाबुराव मुळे हा विजयी संघ होता.यावेळी विजयी संघाला ५००० रु.स्मृती चिन्ह देऊण गौरविण्यात आले.हा सामना पाहण्यासाठी तालुक्यतील असंख्य प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
comments