वेदनांचा प्रवास : वातव्याधी

2015-08-01 13:09:17
     439 Views

आजकाल समाजामध्येसुद्धा वाताचे आजार म्हणजे काय हे माहीत आहे.मला अमुक अमुक वाताचा त्रास होतो असे सर्रास लोक बोलताना आपण ऐकतो.आता हा वात म्हणजे नेमके काय आणि आयुर्वेदानुसार वाताचे आजार का होतात हे आपण पाहू.सामान्यपणे शरीरात झीज होवुन (वशसशपशीरींर्ळींश वळीशरीशी) जे व्याधी शरीराला जडतात त्यांना वाताचे आजार आयुर्वेदानुसार म्हणता येते.
आता हे वाताचे आजार समाजात का होतात याची कारणे आपण बघू.
ङ्घ अतिप्रवास: अगदी लोअर के.जी. पासून ते शाळेची बस किंवा रिक्षा याचा प्रवास आज मुलांच्या मागे लागतो.पुढे दुचाकी,चारचाकी ते असंख्य चाकी (लोकल) पर्यंत हा प्रवास सुरूच राहतो.वाहने आणि रस्ते यांची आपल्याकडे इतकी दुरवस्था आहे की रोज प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे कंबर,सांधे,मणके हे भाग सतत आघात सहन करत असतात.त्यामुळे शरीरात वाताचे आजार होण्यास मदत होते.
ङ्घ अतिशय तिखट,आंबट,खारट आंबवलेले पदार्थ खाणे:मिरचीचा ठेचा, लसुणाची चटणी, फास्ट फूड,पालेभाज्या अती प्रमाणात खाणे,अतिशय कोल्ड ड्रिंक्स घेणे इ.मुळे शरीरात वाताचे आजार वाढण्यास मदत होते.
ङ्घ अतिव्यायाम,अतिशय चालणे, अतिशय पोहणे,अतिशय जागरण,अति स्त्रीसंबंध :’ अति तेथे माती’
हा सुविचार आपल्याला माहीत आहेच.जिममध्ये पैसे भरले म्हणून तासनतास व्यायाम करणे, कामानिमित्त रात्री बराच वेळ जागरण करणे इ.मुळे शरीरात वाताचे आजार वाढीस लागतात.
ङ्घ मानसिक ताणतणाव,मार लागणे इ. मुळेसुद्धा शरीरात वाताचे आजार वाढण्यास मदत होते.
याशिवाय एखाद्या आजारावर झालेले चुकीचे उपचार,आजारानंतर आलेले दौर्बल्य,अतिशय प्रमाणात झालेला रक्तस्त्राव,स्त्रियांचे झालेले गर्भपात इ.गोष्टी वाताचे आजार निर्माण करू शकतात.
वाताचे आजार टाळू इच्छिणार्यांनी आजार होवू नयेत म्हणून तर वाताचे आजार असणार्यांनी आजार लवकर बरा व्हावा म्हणून वरील कारणे टाळावीत.खाण्यापिण्याची तसेच वागण्याची कुठलीही बंधने न पाळता निरीगी आयुष्य मिळणे तसे कठीणच आहे.तरी त्यातल्या त्यात प्रकृतीनुरूप, योग्य प्रमाणात,ऋतूंचा विचार करून व नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हे बंधने काही अंशी शिथिल ठेवूनही निरोगी राहता येते.वाताच्या आजारांनी पिडीत व्यक्तीसाठी आयुर्वेदात असणारया काही ठराविक चिकित्सा पद्धतीची आपण माहिती घेवू.यातील काही डॉक्टरांकडून करून घेण्यासारखे आहेत तर काही डॉक्टरांच्या सल्याने स्वतः करता येण्यासारखे आहेत.
१.अभ्यंग व मसाज ह्न आजकाल या चिकित्सा पद्धतीचे जनमानसात खूप आकर्षण आहे.आयुर्वेदातील अनेक औषधी तेलांच्या वापराने वाताचे आजार बरे होताना दिसतात.बला तेल,नारायण तेल,प्रसारणी तेल इ. तेलांचा वापर यात तज्ञांच्या सल्ल्यानुसार करता येतो.मसाज करताना तेल कोमट असावे.काहीही खाल्ल्यानंतर अभ्यंग करू नये. अभ्यंगानंतर पंख्याचे वारे ,प्रवास,ए.सी.,गार पाण्याची अंघोळ या गोष्टी टाळाव्या.
२.अवगाह :अभ्यंगासाठी वापरायच्या कोमात तैले किंवा औषधींचे कोमट काढे यांच्या टबात बसणे हा वातव्याधीवरील उत्तम उपचार आहे.मुळव्याधीच्या आजारात याचा उत्तम उपयोग दिसून येतो.परंतु काही प्रमाणात हा खर्चिक आहे.
३.स्वेदन : स्वेदन म्हणजे शेक.निरनिराळ्या औषधी वनस्पतीच्या काढ्यांचे,वाळूच्या पुरचुन्डीने शेक,निर्गुंडीच्या पानांचा शेक,गरम पाण्याच्या पिशवीचा शेक,वाफेचा शेक(स्टीम बाथ) असे वेगवेगळ्या प्रकारे शेक दिले जाऊ शकतात.शेकामुळे वाताचे दुखणे कमी होते.सांध्यांच्या कमी झालेल्या हालचाली परत होवू शकतात.
४.बस्ती : सर्व वाताच्या आजारावरील आयुर्वेदातील सर्वात प्रभावी चिकित्सा म्हणजे बस्ती होय.यात गुदद्वारे विविध औषधी काढे, औषधी तेले, औषधी तूप रुग्णाच्या शरीरात सोडले जाते.पावसाळ्यात स्वस्थ व्यक्तीने बस्ती चा कोर्से करून घ्यावा म्हणजे वाताचे आजार होत नाहीत.
५.नस्य : मानेच्या वरील सर्व अववयवाच्या विकारांवर नस्य या चिकित्सेचा उत्तम फायदा होतो. फ्रोझन शोल्डर, मानेच्या मणक्यातील झीज, केस गळणे ,केस पिकणे,स्मृतिभ्रंश,नाकातील हाड वाढणे इ. आजारात या चिकित्सा पद्धतीचा चांगला फायदा दिसून येतो.
६.कर्णपूरण: कानात,नाकात तेल घालण्याची आपली पूर्वीची परंपरा आहे.कानात रोज कोमात तेल घातल्याने बहिरेपण येत नाही.कान दुखत नाही.
७.इतर उपचार : याशिवाय कटीबस्ती (कंबरेवर कणकेची पाळी बनवून त्यात कोमट औषधी तेल घालणे ),मन्याबस्ती (मानेवर कणकेची पाळी बनवून त्यात कोमट औषधी तेल घालणे),हृद्यबस्ती (हृदयाच्या जागी कणकेची पाळी बनवून त्यात कोमट औषधी तेल घालणे),शिरोबस्ती( डोक्यावर चामड्याची टोपी घालून त्यात कोमट औषधी तेल घालणे),तळपायांना औषधी तेल अथवा तूप चोळणे असे किती तरी उपाय वाताच्या आजारांवर करता येतात.निरनिराळे औषधी काढे,तेल,तूप, गुग्गुळ इ. उपचारांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करता येतो.
आयुर्वेदाच्या चिकित्सेने मणक्यांचे अथवा सांध्यांचे एक्स रे बदलतीलच असे नाही परंतु लक्षणे कमी निश्चीतच करता येतात.तसेच काही सौम्य योगासने जसे अनुलोम विलोम प्राणायाम,कपालभाती इ. योग सल्ल्याने उत्तम उपशय मिळण्यास मदत होते.मृत्यू कुणालाच चुकलेले नाही परंतु तोपर्यंतचा प्रवास सुखाचा व दीर्घ करायचा असेल तर मात्र त्यासाठी योग्य प्रयत्न करायला हवेत.डॉ.मिथुन रमेश पवार, एम.डी.(आयु.)
आयुर्वेद विस्तार अधिकारी व जिल्हा आयुष अधिकारी ,
जिल्हा परिषद ,बीड
comments