पत्रकार हल्लाविरोधी कायदा हवाच - खा. मुंडे

12/01/2013 19 : 51
     499 Views

बीड !
समाजासाठी व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काम करणा-या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. बीडमध्येही पत्रकार संजय मालाणी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. असे सांंगताना पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा व्हायला हवा आणि त्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त करुन त्यांनी बीड जिल्हा पत्रकार संघाने आतापर्यंत दिलेले सर्व पुरस्कार एक उंची गाठलेल्यांनाच दिले आहेत असे म्हणत त्यांनी मान्यवरांचे जिल्ह्याच्या दुष्काळाकडे लक्ष वेधत जिल्ह्यात यावर्षी भीषण परिस्थिती आहे. अशावेळी खासदार आणि आमदारांचा अर्धा फंड पाणी प्रश्न निवारण्यासाठी वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घ्यायला हवा असेही म्हटले.
ते येथील बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा स.मा.गर्गे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ क्रीडा समीक्षक व मुक्त पत्रकार व्दारकानाथ सांझगिरी यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, महसुल राज्यमंत्री प्रकाश सोळुंके, आ. बदामराव पंडित, माजी आमदार उषाताई दराडे, सय्यद सलीम, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, स्व. स.मा. गर्गे यांचे चिरंजीव संजय गर्गे, कन्या श्रीमती कविता भालेराव, संदीप क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, देशातील स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतर राष्ट्राच्या विकासात दिलेले योगदान खूप महत्वाचे ठरते. भारताला स्वातंत्र्या मिळवून देण्यात पत्रकारांची भूमिकाही महत्वाची ठरली. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास कशा पध्दतीन व्हावा त्याला कशी दिशा असावी याचेही मार्गदर्शन त्यावेळच्या संपादकांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून केले आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी व्दारकानाथ सांझगिरी यांची झालेली निवड योग्य असल्याचे म्हणत उत्तम अभियंता म्हणून चांगले काम केलेल्या सांझगिरी यांनी विविध दैनिके, साप्ताहिक, मासिक, क्रीडा विषयक मासिकातून केलेल्या लिखाणातून आपला ठसा उमटविला आहे. बीड जिल्हा पत्रकार संघाने चालवलेला हा उपक्रम चांगला असल्याचेही ते म्हणाले. वृत्तपत्रांची संख्या वाढली असे दिसत असले तरी लोकसंख्याही त्याचप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आणखी वृत्तपत्रांची गरज असल्याचे सांगून स्वातंत्र्यपूर्व काळातील संपादकाचे योगदान विसरणे शक्य नाही. आजच्या पत्रकारांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकहिताच्या दृष्टीने पत्रकारिता करावी असे म्हटले.
सत्काराला उत्तर देताना द्वारकानाथ संझगिरी म्हणाले की, पत्रकारीता ही नेहमीच चांगल्या गोष्टींसाठी केली पाहिजे.खेळ आणि राजकारण बाबी स्वतंत्र राहिल्या पाहिजे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगून त्यांनी संयोजकांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वाराकानाथ संझगिरी यांना स्व. स. मा. गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात स्मृतीचिन्ह, एक लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे या पुस्काराचे स्वरुप आहे.
कायक्‌रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
या कार्यक्रमास बीड जिल्ह पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
comments