दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

05/01/2013 20 : 19
     762 Views

आज दि.६ जानेवारी २०१३ वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारी या तारखेला विशेष महत्व आहे. कारण आजपासून साधारणपणे १८१ वर्षीपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई मध्ये दर्पण या नावाने पाक्षिकास सुरूवात केली आणि तो मराठी वृत्तपत्रसृष्टीचा सुवर्ण दिन ठरला. भारतात या आगोदरही बंगाली, मल्याळम ,गुजराती, हिंदी, आदी भाषांमध्ये नियकालिके निघत होती, परंतू मराठी भाषेमध्ये ते सुरू होण्यास १८३२ हे साल उजाडावे लागले. भारतात पहिले वृत्तपत्र सुरू करण्याचा मान जेम्स ऑगस्ट हिकी या ब्रिटीश माणसाला जातो. त्यांनी २९ जानेवारी १७८० रोजी बेंगाल गॅझेट नावाने वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर मराठीमध्ये वृत्तपत्र निघण्यास तब्बल ५२ वर्षाचा कालावधी लोटावा लागला.
बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या पाक्षिकाचे नाव दर्पण त्या वेळेच्या प्रचलित असलेल्या प्रद्धतीनुसारच ठेवले होत.े कारण त्याकाळी निघणा-या सर्व नियतकालिकांची नांवे प्रकाशपर्वाशी निगडीत असत. जसे ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश आदी आरसा ज्याप्रमाणे प्रकाशाचे परावर्तन करतो त्याप्रमाणे नवशिक्षित तरूणांनी वृत्तपत्राच्या माध्यमातुन नव्या ज्ञानाचे परावर्तन करावे या हेतूने जांभेकरांनी पत्र सुरू करण्याचे उद्दिष्ट सांगताना १२ नोंव्हेंबर १८३१ रोजी घोषीत केलेल्या दर्पणच्या प्रस्ताविकात जांभेकर म्हणातात,स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास व्हावा आणि या देशाची समृद्धी येथील लोकांचे कल्याण या विषयी स्वतंत्र व उघड रीतीने विचार करण्यास स्थळ व्हावे या इच्छेने दर्पणाचा प्रप्रंच आरंभला आहे. या प्रास्ताविकानुसारच जांभेकरांनी आपले वृत्तपत्र दोन भाषेमध्ये चालविले म्हणजे पृष्ठाच्या एका भागात इंग्रजीमध्ये मचकूर छापला जाई व दुस-या भागात मराठी भाषेमध्ये ते छापले जात. म्हणजे दर्पण हे वृत्तपत्र व्दिभाषीक वृत्तपत्र म्हणून चालविले जायचे. याचे कारणही तसेच होते कारण इंग्रजांना मराठी भाषा येत नव्हती आणि भारतीयांना इंग्रजी कळत नव्हते. त्यामुळे जांभेकरांनी भारतीय जनता व इंग्रज यांच्यात दुवा साधण्यासाठी ते वृत्तपत्र द्विभाषीक पद्धतीने चालविले जेणेकरून ब्रिटिश सरकार व भारतीयांत सुसंवाद घडावा हा उद्देश सफल होत होता.
आधुनिक पत्रकारितेमध्ये उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरविताना प्रा.फ्रेझर बॅक यांनी माहिती देणे, विश्लेषण करणे, शिक्षण देणे आणि मनोरंजन करणे या चार कार्यांवर अधिक भर दिला आहे. त्यांनी वस्तू व सेवांच्या वितरणासाठी जाहिरात करणे हे पत्रकारितेचे कार्य मानलेले नाही त्या प्रमाणेच बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या दर्पण या पाक्षिकात व दिग्दर्शन या मासिकात कुठेही कसलीच जाहिरात छापली नाही. त्यांनी १८३२ ते १८४० ही तब्बल आठ वर्षे आपले पाक्षिक, मासिक पदरमोड करून फक्त जनसामान्यांच्या हितासाठी चालविले. जाहिराती विना वृत्तपत्र चालविण्याची कसरत करत त्यांनी आठ वर्षे हे वृत्तपत्र चालविले व त्यातून सामाजिक कल्याणाचा विचार करून ते वृत्तपत्र चालविले. त्यांच्या या दोन्ही नियतकालिकांचा उद्देश अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक कल्याण साध्य करण्यासाठी सरकार व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्य करण्याचे होते. सार्वजनिक जीवनात कार्य करताना संस्था आणि लोक , तसेच संस्था आणि सरकार यांच्यातील समन्वयावर त्यांनी भर दिला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची किनार लोकशाही जीवन पद्धतीला अधिक बळकटी आणून देणारी होती.
बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षाच्या अल्पशा जीवन काळात गणितापासून व्याकरणापर्यंत, भूगोलापासून मानसशास्त्रापर्यंत, खगोलविद्येपासून ते पुरातत्वविद्येपर्यंत अनेक ज्ञान शाखांत त्यांनी नैपुण्य मिळविले या तीन दशकांच्या जीवनवळातील त्यांच्या कामगीरीकडे पाहता अचंबित व्हायला होते. या विद्याविभूषीत व ख-या अर्थाने आचार्य असणा-या बाळशास्त्री जांभेकरांना आजच्या मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभ दिवशी म्हणजे दर्पण दिनी कोटी कोटी प्रणाम...
प्रा. कैलास कांबळे
comments