आकाशवाणीचा बहुजन दुखाय

2016-08-13 9:37:11
     1179 Views

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतीक, पुरोगामित्वाला बळ देवून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्वाप्रमाणे काम करणा-या पुणे आकाशवाणी केंद्रावरील सकाळी सात वाजून पाच मिनिटाने दररोज दिले जाणारे बातमीपत्र बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आकाशवाणीचा बहुजन श्रोता दुखावला गेला आहे. भारतात १९३० मध्ये कलकत्ता आणि मुंबई येथे सर्वप्रथम खाजगी कंपनीने आकाशवाणीने प्रसारन सुरु केले. त्यावेळी तत्कालीन ब्रिटीश सरकारने हि कंपनी ताब्यात घेतली आणि १९३६ मध्ये तत्कालीन केंदीय सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या अंतर्गत ऑल इंडिया रेडिओची सुरवात केली. तर भारत स्वातंत्र झाल्यावर १९५७ मध्ये आकाशवाणी हे सार्थ नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर पहिले माहिती आणि नभोवाणी मंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी आकाशवाणीच्या कार्याचा पाया घातला . नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतीय जनतेला राष्ट्र उभारणीसाठी विकासासाठी जनतेला प्रेरित करणे, तसेच लोकशिक्षण, मनोरंजन आणि माहिती प्रसारणाचे कार्य अविरतपणे केले आहे. स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीचे महत्व ओळखुन देशात मद्रास, मुंबई, दिल्ली, कानपूर, पुणे, अलाहाबाद अशा शहरामध्ये आकाशवाणी केंद्रांची सुरवात केली. शासनाने लोककल्याणकारी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आकाशवाणी केंद्रावरुन हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र सुरु करण्यात आली. त्याच प्रमाणे प्रादेशिक भाषेमध्ये देखिल वृत्तविभाग सुरु करण्यात आले. त्यानुसार १९७५ साली तत्कालीन माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री इंद्रकुमार गुजराल यांनी पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र सुरू करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र दिनी १ मे पासुन पुणे केंद्रावरून मराठीतील पहिले बातमीपत्र प्रसारित करण्यात आले. हे बातमीपत्र सुरु झाल्यापासून आजतागायत वृत्तविभाग अखंडपणे बातम्या देत आला आहे. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणी पुणे, ..... प्रादेशिक बातम्या देत आहेत, हे वाक्य सुरू झाले, की अनेकांचा दिवस ख़रया अर्थाने सुरू होतो. मात्र, आता हा विभागाच बंद करण्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका आदेशानुसार पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्तसंपादक ही दोन्ही पदे अनुक्रमे श्रीनगर आणि कोलकत्याला हलविण्यात येणार आहेत. पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग हा राज्यातील सर्वात जुना आणि मोठा विभाग आहे. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी काम करून आकाशवाणीच्या बातमीपत्राची परंपराही जोपासली आहे. आकाशवाणीच्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी लागणा़रया प्रादेशिक बातम्या आजही ग्रामीण भागात मोठ़या प्रमाणावर ऐकल्या जातात. नागरिकांना जगातील घडामोडींची माहिती देणारे बातमीपत्र अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला होता. हे बातमीपत्र पुणे आकाशवाणीच्या वृत्तविभागाद्वारेच तयार केले जाते. त्यामुळे इतका मोठा वृत्तविभाग बंद करण्याआधी त्यावर साधी चर्चाही न झाल्याने हा निर्णय वादग्रस्त ठरल्याचे दिसत आहे.
भारतातील लडाखमधील लेर तवांग पासून अंदमान निकोबार बेटापर्यंत आणि राजकोटपासून कलकत्यापर्यंत एकुण ९९ टक्के भुभागावर आणि ९९.७५ टक्के भारतीय जनतेपर्यंत आकाशवाणीचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. आकाशवाणीने मराठी भाषीकांना मनोरंजन, विज्ञान, लोकसंगीत, आरोग्य विषयक, कृषी विषयक माहितीपर कार्यक्रमांची मेजवाणी दिली आहे. तर वृत्त विभागाने बातम्या, संसदसमिक्षा, भाषणे, चर्चा, शैक्षणीक वृत्त, राजकीय आपत्तीच्या प्रसंगाचे आणि निवडणुकांचे वार्तांकन निपक्षपातीपणे केले आहे. तर मित्र राष्ट्रावरिल टिका, धर्म, जातीजमातीवरील पक्षपाती टीका, अपमानकार अथवा अश्लिल विधाने, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हिंसेला चालणा मिळेल, अशा घटनांना कधीच स्थान दिले नाही त्यामुळे आकशवाणीच्या बातमीपत्र जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. आज समाजमाध्यमांच्या स्पर्धेत आकाशवाणीचा विचार करता सत्यतेला पात्र ठरली आहे. देशात नव्याने एफ.एम.चे आणि ऑनलाईन रेडीओचे वारे वहात आहे. काही दिवसापूर्वी खाजगी एफ.एम.ला बातम्या प्रसरणास परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारचा विचार चालू असतानाच
पुणे आकाशवाणी केंद्राचा मानबिंदू ठरलेल्या प्रादेशिक बातम्या नजीकच्या काळात इतिहासजमा करण्याचा केंद्राने प्रयत्न चालवला आहे. या केंद्राच्या रिलोकेशन ची मंगळवारी जी सरकारी सूचना निघाली, तिचा हाच अर्थ आहे ! महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार प्रमुख केंद्रांत आकाशवाणीचे वार्ता विभाग आहेत. पुण्यात उपसंचालकाचा दर्जा असलेल्या अधिकार्याच्या अमलाखालील वार्ता विभागाकडून वर्षानुवर्षे रोज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी रेडिओवर प्रादेशिक बातम्यांचे प्रसारण होत आले आहे. महाराष्ट्रातील चारपैकी फक्त पुण्याच्या वार्ता विभागाच्या उच्चाटनाचा फतवा निघाल्यामुळे नजीकच्या काळात येथील वार्ता उपसंचालकांची बदली होईल, तसेच कंत्राटी पद्धतीवर भरती केलेल्या वृत्तसंपादकाचे पद रद्द होईल. परिणामी वर्षानुवर्षे ऐकू येणार्या पुणे केंद्रावरील सकाळच्या प्रादेशिक बातम्या बंद होणार आहेत. आकाशवाणीने ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि शिक्षणासाठी सदैव तत्परता दाखवली आहे. त्याच बरोबर राष्ट्र उभारणीपासुन देशातील मानवी जीवणाच्या प्रत्येक घटकांच्या कार्यक्रमाचे प्रसार केले आहे. याच पुणे आकाशवाणी केंद्राने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण केले आहे. त्यामुळे विकासाला चालना देणा-या घटकाला प्राधान्य दिले आहे. या केंद्रावरुन प्रसारित होणारे बातमी पत्र हे तर प्रत्येकच्या पसंतीस उतरले आहे. ग्रामिण भागात ज्या ठिकाणी वृत्तपत्र पोहचले नाही, वाहिन्यासाठी रेंज येत नाही. त्या ठिकाणी आकाशवाणीचे बातमीपत्र पोहचले आहे. मात्र केंद्र सरकारने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा आदेश दिला आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका आदेशानुसार पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदे अनुक्रमे श्रीनगर व कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत. तसेच वृत्त विभागात नवीन पदे भरली जात नसल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचणारा हा आवाज आता लवकरच बंद होणार आहे. टीव्ही चॅनेल, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या सध्याच्या फास्ट जगात दिवसभर बातम्यांचा भडिमार सुरू असतो. तरीही महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिक सकाळी ७.१०च्या बातम्या आवर्जून ऐकत होते. नागरिकांना जगातील घडामोडींची माहिती देणारे १० मिनिटांचे बातमीपत्र अनेकांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले होते. त्यामुळे बातम्याची विश्वसनीयता, सत्यता कायम ठेवण्यासाठी एकाही आकाशवाणी केंद्रावरील वृत्तविभाग बंद न करता त्या वृत्त विभागाला बळकटी देण्याची गरज आहे. त्यामुळे माध्यमांच्या स्पर्धेच्या युगात आकाशवाणीचा श्रोता कायम ठिकून राहील.
प्राचार्य विठ्ठल एडके
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय बीड
comments