पत्रकारांची बांधिलकी समाजाप्रतीच असावी : देशमुख

2016-04-13 8:44:25
     802 Views

किल्लेधारुर
पत्रकारांनी जिथे दु़ःख आहे ,वेदना आहे तिथे तळमळीने संघर्ष करावा असे मत अखील भारतीय मराठी पत्रकार परीषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.

येथिल पंचायत समीती सभागृहात शनीवारी ता.९ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्री एस.एम.देशमुख व डाँ,बाबासाहेब आँबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.प्रदीप दुबे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी आमदार आर.टी.देशमुख होते.व्यासपीठावर प्रा.डां,राजेश करपे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य रमेश आडसकर,डाँ,स्वरुपसिंह हजारी,जेष्ठ पत्रकार राजेद्र आगवान,नरेद्रं कांकरीया, सर्वोत्तम गावरस्कर,राजेद्रं होळकर,राम शिनगारे,यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री देशमुख म्हणाले हल्ली पत्रकाराविषयी चांगले बोलले जात नाही.बुध्दिवादी विचारवंताचे कौतूक होत आहे ही चांगली बाब आहे.

पत्रकारावर होणारे हल्ले ही गंभिर बाब आहे.ज्यांचे हितसंबध दुखावले जातात तेच हल्ला करतात.अश्यावेळी समाजाची भुमीका पत्रकारासोबत आसावी.श्रमीक पत्रकारासोबत मालक नसतो आणी समाजही नसतो.राजकारण्यांच्या संपर्कामुळे पत्रकारात गटबाजी आहे.ईथे परस्थीती वेगळी आहे.चाँगली बाब आहे,जिथे वेदना आहे दु़ंःख आहे.तिथे संघर्ष करावा.आवश्यकता भासल्यास रस्त्यावर येवुन सघंर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे,सत्काराला उत्तर देताना विद्यापीठाचे क्रिडासंचालक प्रा.प्रदीप दुबे म्हणाले जन्मभुमीत झालेल्या सत्काराने भारावुन गेलो आहे.

दुष्काळात पुढारी काम करत नाहीत.त्याहीपेक्षा चांगले काम पत्रकार करतात यामुळेच शासन,वेगवेगळ्या संस्था आनी स्ंघटना काम करीत आहेत.अध्यक्षीय समारोपात आमदार श्री देशमुख म्हणाले एक आसामान्य व्यक्तीमत्व माझ्या मतदारसंघातील आहे याचा अभीमान आहे.वडवनी ते देवडी बससेवा सुरु करण्यात येईल.अंबाचंडी नदीचे खोलीकरण वबंधारे बांधण्यात येतील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद शाकेर,परीचय राम शेळके.प्रास्ताविक अनिल महाजन आभार प्रर्दशन प्रकाश काळे यांनी केले.
comments