पेडन्युज निवडनूक आयोगाच्या रडारावर

04/10/2012 17 : 44
     407 Views

नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला त्यानुसार निवडणूक कार्यक्रम राबवला जात आहे. या निवडणूकीमध्ये पेड न्युजचे पीक मोठ्या प्रमाणावर फोपावणारे दिसताच राज्यनिवडणूक आयोगाने पेडन्युजवरती नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती निवडणूक काळात दररोज प्रत्येक बातमीचे परिक्षण करणार आहे. आणि संबंधीत पेडन्युज निदर्शनास आली कीे उमेदवार आणि वृत्तपत्र यांच्यावर संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. मात्र नांदेड येथील पत्रकार खाजगीत निवडणूक आयोगाचा समिती स्थापण्याचा निर्णय वृत्तपत्र स्वातंत्र्यावर आक्रमण असल्याचे बोलत आहेत. मात्र निवडणूका स्वच्छ,पारदर्शक वातावरणात पारपाडून लोकशाही बळकट आणि संवर्धन करण्यासाठी पेडन्युज परिक्षणासाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतेला आहे.यामुळे पेडन्युज निवडनूक आयोगाच्या रडारावर आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी उमेदवारांनी लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी,वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अथवा प्रसिद्धी न करण्यासाठी पैशाच्या तालावर प्रसारमाध्यमांना नाचवले आणि प्रसारमाध्यमेही बेधुंद होऊन पैशाच्या तालावर नाचली. त्यामुळे पत्रकारितेत पेड न्युजची अनिष्ठ प्रथा रूढ झाली. पेडन्युज प्रकरणात उमेदवार हे आपल्या स्वचछ प्रतिमेच्या बातम्या छापाव्यात ,मुलाखत छापावी,विरोधकाच्या चुका छापाव्यात, आश्वासनपूर्ती केलेल्या कामाचे फोटो छापावेत, यासाठी वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांबरोबरच व्यवहार ठरवतात. तर वृत्तवाहिन्या लाइव्ह कवरेज, स्पेशल फीक्स उमेदवारासोबत संपूर्ण दिवस अशा प्रकारामधुन पेडन्युज प्रसारित करण्याचे काम केले जाते.
महाराष्ट्रातील काही अपवाद (लोकसत्ता) वगळता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी निवडणूकीत प्रसिद्धी हवीय तर मग पैसे द्या! असा धंदाच मांडाला आहे. पेडन्युजच्या माध्यमातून उमेदवाराबाबतची चुकीची माहिती आणि खोटी माहिती बातमी म्हणून माध्यमांनी वाचकाला म्हणजेच मतदाराला उपलब्ध करून देणे म्हणजेच लोकशाहीच्या केंद्रस्थानी असलेल्या निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करते आहे. पेडन्युजमुळे निवडणूकीतील उमेदवार,प्रचाराला बोलवलेले सेलिब्रिटी,पैसा आणि प्रसार माध्यमे या सर्व गोष्टी हातात हात घालून धुमाकूळ घालू लागल्या आहेत. यामुळे ज्या उमेदवाराकडे पात्रता आहे पण पैसा नाही अशांचा आवाज दाबण्याचे कुकर्म प्रसारमाध्यमे करू लागली आहेत. याचा धोका भारतीय लोकशाहीला निर्माण झाला आहे. म्हणूनच राज्य निवडणूक आयोगाने नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूकीत सर्वसामान्य उमेदवाराचा आवाज दाबला जणार नाही,उमेदवार पैशाची उधळपट्टी करून निवडणून येणार नाहीत आणि प्रसारमाध्यमांनी पेडन्युजचा धंदा मांडू नये यासाठी पेडन्युज देखरेख समिती स्थापन केली आहे.
पेडन्युज प्रकरणात मालक,संपादक,वार्ताहर,यांचे हात काळे झाले आहेत. त्यामुळे माध्यमांवर वाचकांचा विश्वास उडत चालला आहे. विश्वासर्हता आणि अचुकता या दोन मुद्यांवर माध्यमे चालतात पण आजच्या माध्यमात विश्वासार्हता आणि अचुकता दिसत नाही. एवढे माध्यमांचे अधपतन: झाले आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध यमाकडे पाहिले जाते. मात्र आजचा मिडीया सर्व काही पैशासाठी ,नफ्यासाठी करत असल्याने समाजाच्या नितिमुल्यांसाठी,हक्कासाठी लढणारी माध्यम दिसत नाहीत. कारण माध्यमामध्ये कार्पोरेट क्षेत्रातून मोठी गंतवणूक होत आहे. कार्पोरेटच्या शिरकावामुळे माध्यमातून सर्वसामांन्याचा आवाज आणि चेहरा हरवला जात आहे. हे लाकशाहीसमोरील आव्हान आहे. राज्यकर्ते आणि कार्पोरेट झालेली प्रसारमाध्यमे ही कितीही धुतल्या तांदळासाखी दिसत असली तरी त्याला भ्रष्टाचाराची किनार आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी पेडन्युजला बळी न पडता समाजाच्या नितीमूल्यासाठी, हक्कासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी झगडणे अपेक्षित आहे. प्रा.विठ्ठल एडके
vbedake@gmail.com
comments