निवडणुकामध्ये NOTA वापराबाबतच्या सूचना

07/12/2013 11 : 38
     318 Views

बीड
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये मतदाराला मत पत्रिकेवरील कोणत्याही उमेदवारांना मतदान करण्याची इच्छा नसली तरी त्याला आपला मतदाराचा हक्क गोपनीय रित्या बजावता यावा याकरिता मतदार यंत्रावर ‘ वरील पैकी एकही नाही ’ ( NOTA) हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मतदार आपले मतदान पुर्ण न करता मतदान कक्षामधून बाहेर निघाला तर मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्षांनी कंट्रोल युनिटवरील लाल दिवा न विझल्यामुळे तसेच बिप साऊंड न आल्यामुळे मतदाराने, मतदान पूर्ण केलेले नाही ही गोष्ट लक्षात येईल. अश्या परिस्थतील मतदान केंद्राध्यक्षाने संबंधीत मतदारांना त्याचे मतदान पूर्ण न झाल्याचे कल्पना देऊन पंसतीच्या उमेदवारांना मत अथवा ‘ वरील पैकी एकही नाही ’ ( NOTA) या पर्याय समोरील बटन दाबून मतदान पूर्ण करण्याबाबत विनंती करेल जर मतदारांने पुन्हा मतदानाच्या कक्षात जाऊन मतदान केल्यास मतदारांची मतदान प्रक्रिया पुर्ण होईल. मात्र एखादया मतदाराने पसंतीच्या उमेदवारांला मत देण्यास अथवा ‘ वरील पैकी एकही नाही ’ ( NOTA) या पर्याय समोरील बटन दाबण्यास नकार दिला तर केंद्रध्यक्षांनी बॅलट युनिटवरील उमेदवारांच्या नावासमोरील दिवे एखादा पुठ्ठा अथवा पुस्तक ठेवून झाकावेत त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधीना बरोबर घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण झाले आहे. त्या मत पत्रिकेवरील ‘ वरील पैकी एकही नाही ’ ( NOTA) या पर्यायासमोरील बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावे.जर एखाद्या मतदाराने मतदान कक्षात जाण्यापूर्वीच मतदानास नकार दिला तर अशा मतदाराच्या मतदार नोंदवहीत (व्हीएम-1) नोंदीसमोर अभिप्राय या रकान्यात मतदानास नकार दिल्याची नोंद घेतील. अशा नोंदविलेल्या मतदानाच्या हिशोबामध्ये (व्हीएम-3) अनुक्रमांक -3 येथे मतदारांची संख्या नमूद करण्यात येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशात दिली असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
comments