उद्योन्मूख पत्रकारांच्या मानसिकतेवर घाला...!

02/10/2012 0 : 16
     483 Views

बीड, (गणेश सावंत) : पत्रकारितेत पाऊल टाकू इच्छिणा-या नवख्या उदयोन्मूख पत्रकाराला प्रेरणा, प्रोत्साहन, नवी उमेद अन् लेखनाचे बळ देण्याचे काम करणा-या पत्रकार संजय मालाणी यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे उदयोन्मूख पत्रकारांच्या मानसिकतेवर घातलेला घाला आहे. निर्भिडपणे काम करणारे संजय मालाणी हे नवख्या पत्रकारांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. प्रत्येकाला प्रत्येकवेळी केवळ सकारात्मक मार्गदर्शन करणा-या पत्रकारावर अशा स्वरुपाचा हल्ला होणे म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची अपेक्षा बाळगणा-यांच्या मानसिकतेवरचा हा आघात आहे. कदाचित या हल्ल्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राकडे वळणारी अनेक पावलं जागच्या जागी थबकू शकतात. कारण पत्रकारितेचे शिक्षण घेतांना निर्भिड, नि:पक्ष, प्रामाणिक, अभ्यासू, बेधडक पत्रकारिता करणारांना कशाचिही भिती नाही. असे सांगितले जाते, शिकवले जाते. मात्र पुस्तकातील शब्दांपेक्षाही जास्त निर्भिड, नि:पक्ष, प्रमाणिक, बेधडक, अभ्यासू पत्रकारिता करणा-या संजय मालाणी यांच्यावरील हल्ला हा पत्रकारितेच्या विद्याथ्र्यांच्या मनात धडकी भरवणारा आहे. कारण निर्भिड, बेधडक आणि नि:पक्ष पत्रकारितेचे संजय मालाणी हे एक ज्वलंत उदाहरण आहेत. सरकारी कचेरीपासून ते खासगी क्षेत्रातील असंख्य लोकांच्या ओळखी अन् त्यांचा संजय मालाणी यांच्यावर असणारा विश्वास हा त्यांच्या पत्रकारितेची पावती आहे. मात्र एवढे कतृत्व मिळवून, प्रामाणिक पत्रकारिता करूनही जर त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.
comments