उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना

2019-04-12 18:43:08
     35 Views

बीड
बीड जिल्हयातील तापमानात वाढ झाली असल्याने उष्मघाताचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये यासाठी नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी केल्या आहे.

तिव्र उन्हात दुपारी 12.00 ते 3.00 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे 65 वर्षे व्यक्ती 1 वर्षाखाली व 1 ते 5 वयोगटातील मुले ,गरोदर माता, मधुमेहचे -हदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती,अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणा-या व्यक्तीनी पुरेसे पाणी पीत रहावे, हलक्या रंगाचे सुती कपडयाचा वापर करावा,घराबाहेर पडतांना छत्री,टोपी,गॉगलचा वापर करावा,मद्य,चहा,कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे, शिळे अन्न खाऊ नये, उन्हात काम करत असतांना चेहरा व डोक्यावर ओल्या कपडयाने झाकावे,चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे, ओआरएस व लस्सी,ताक,लिंबुपाणी इत्यादी घरगुती शितपेयांचे भरपूर सेवन करावे, कडक उन्हामध्ये बाहेरील शारिरीक कामे करु नये. गडद व घटट कपडे घालू नये.लहान मुले व प्राळीव प्रण्यानां बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनामध्ये ठेवू नये. मुक्या प्राण्यानां सावलीत ठेउुन भरपूर पाणी पाजावे. स्थानिक स्तरावर व्यापक प्रसिध्दी देण्यासाठी होर्डीग,भितीपत्रके,पॅम्प्लेट याचा मोठया प्रमाणावर वापर करावा. जिल्हा,तालुका,गाव पातळीवर उक्त सूचनांचा प्रसार होणे आवश्यक आहे. होर्डींग तयार करुन वर्दळीच्या ठिकाणी लावावेत,चित्रपट गृह,शाळा,महाविद्यालये,शासकीय निमशासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी भितीपत्रके लावावेत आडवडी बाजारात पॅम्प्लेट वाटावीत,प्रसार माध्यमाव्दारे,सोशल मिडीया आणि रेडीओव्दारे उष्मघातासंबधी माहिती प्रसारित करावी.

उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे शरीराचे तापमान खाली आणण्याचा प्रयत्न करावा,ओल्या कपडयाने आंग पुसावे, थंड पाणी डोक्यावर टाकावे किंवा ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करुन उपचार सुरु करावे, उष्मघात घातक ठरु शकतो. उष्णते बाबत काळजी घेण्याची प्रसिध्दी देण्यात यावी,असेही जिल्हाधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
comments