जयभिम महोत्सवात उत्कृष्ट देखावा स्पर्धा

12-04-2019 : 06:37:59
     71 Views

सहभागी होण्याचे संयोजन समितीचे आवाहन
बीड,दि.12(प्रतिनिधी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील प्रसंग आणि घटना याचा देखावा मिरवणूकीत सादर करण्याचा विषय देण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये बाजी मारणार्‍या उत्सव समितीस प्रथम पारितोषिक 11 हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक 7 हजार रूपये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक 5 हजार रूपये व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त देखावे मिरवणुकीत सादर करावेत असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव तसेच उत्कृष्ट देखावा समितीकडून करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही उत्कृष्ट देखावा स्पर्धा येत्या रविवार दि.14 एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या मिरवणुकीत संपन्न होणार आहे. या उत्कृष्ट देखाव्यात बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील प्रसंग व घटना देखाव्याच्या स्वरूपात जयभीम उत्सवांनी सादर करायच्या आहेत. उत्कृष्ट देखावे तयार करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीस, शॅडो माती, फायबर प्लायवुड बोर्डस, कागद, पुठ्ठे, इफेक्ट्स यांचा वापर करता येणार आहे. बाबासाहेबांची पुर्णाकृती, अर्धाकृती पुतळे देखाव्यामध्ये ठेवता येणार आहे. देखाव्याच्या मागच्या बाजुस ज्या मंडळाने देखावा केला आहे. त्या मंडळाचे पुर्ण नाव,पत्ता असलेले बॅनर लावणे बंधनकारक असणार आहेत असेही संयोजन समितीने म्हटले आहे.जास्तीत जास्त जयभीम महोत्सवांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख नवनाथ पोटभरे, अनिल विद्यागर, श्रीराम वीर, बापु उजगरे, ऍड.संगीता वीर, कॅप्टन राजाभाऊ आठवले, अशोक गायकवाड, सुमेद जोगदंड, संतोेष बनकर तसेच देखावा समितीचे जोगेंद्र गायकवाड मो. 9423470231, अमर विद्यागर मो. 9850161046, प्रा. राम गव्हाणे मो. 9730635920, प्रा. राजेश ढेरे मो.9421335301, प्रा. उत्तम साळवे मो. 8830214428 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.
comments