युपीएससीतील यशाबद्दल डॉ. स्नेहा गित्ते यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार

2019-04-12 18:32:55
     39 Views

बीड (प्रतिनिधी)ः- युपीएससी परीक्षेत डॉ. स्नेहा सूर्यकांत गित्त यांनी १३१ वी रँक घेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल त्यांचा नाथ सावली प्रकल्प व मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने दि. ११ एप्रिल रोजी बीड येथील त्यांच्या निवासस्थानी जावून सत्कार करण्यात आला.
डॉ. स्नेहा सूर्यकांत गित्ते यांनी पहिल्याच प्रयत्न युपीएससी परीक्षेत यश संपादन केले. त्याबद्दल नाथ सावली प्रकल्प व मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना डॉ. स्नेहा गित्ते म्हणाल्या की, अभ्यासात सातत्य, एकाग्रता तसेच अभ्यासचे नियोजन केल्यास यश निश्‍चित मिळते. माझ्या यशामध्ये माझे आई-वडील व अविनाश धर्माधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे. यावेळी डॉ. स्नेहा गिते यांचा प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.संजय तांदळे, सोमनाथ गित्ते, महारुद्र मोराळे, दिलीपराव चिंचोलकर यांनी सत्कार केला.
comments