मुंडे साहेबांच्या ‘लेकींच्या’ नेकीचे राजकारणामुळे जनतेत ‘एकीची’ भावना

2019-04-12 18:12:57
     183 Views

सर्वांना सोबत घेवून केलेल्या कामांची पावती देणार मतदार
बीड
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पश्‍चात त्यांच्या विचारांसा वसा आणि वारसा घेवून ना.पंकजाताई आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जातीपातीच्या राजकारणाला मुठ - माती देण्याचे काम केले, सर्व जातीधर्माला सोबत घेवून सर्व सामान्य मानसाला विकासाचा केंद्र बिंदु मानत समाजातील सगळ्यात खालच्या वर्गाला देखील योजनांचा लाभ कसा मिळेल याचा प्रयत्न या दोन्ही भगिनींनी सातत्याने केला. याचेच फलित म्हणून मुंडे साहेबांच्या लेकींच्या या नेकीच्या राजकारणामुळे जनतेत एकीची भावना निर्माण झाली असुन सर्वांना सोबत घेवून केलेल्या कामांची पावती खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पाठीशी मतदान रूपी आशिर्वाद देवून बीडकर पावती देणार असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात दिसत आहे.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी गेल्या साडेचार वर्षात बीड जिल्ह्याच्या राजकारणाला विकासाची जोड देवून वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे. सातत्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला विकासाचा केंद्र बिंदु मानून आणि जातीपातीच्या, धर्मांच्या पलिकडे जाऊन त्यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही निवडणूका आल्या की विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून केवळ जातीयवादाचे विष पेरण्याचे काम विरोधकांकडून सातत्याने होत असल्याचे बीड जिल्ह्यात समिकरण झाले होते. दिन,दलीत,वंचीतांसाठी झटणार्‍या लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या निवडणूकांच्या वेळीही अशा प्रकारचा विषारी प्रचार करून बीड जिल्ह्यातील जनतेची दिशाभुल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला. परंतु बीड जिल्ह्यातील सुज्ञ आणि मुंडे साहेबांवर नितांत प्रेम करणार्‍या जनतेने विरोधकांच्या या विषारी प्रचारला,जातीवादाला कधीही थारा दिला नाही. मोठ्या मताधिक्याने मुंडे साहेबांना दर निवडणूकीत विजयी करण्याचे काम या बीड जिल्ह्याच्या बहादुर जनतेने केले आहे.गेल्या साडेचार वर्षात जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेला सर्वात प्रथम बीड जिल्ह्यात आणले. कोट्यावधी रूपयांचा निधी या जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रयत्नाने खेचून आणला. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर बीड जिल्ह्यातील रस्ते चकाचक झाले आहेत. कुठे तरी एखादा चांगला महामार्ग असावा अशी बीडकरांची गेल्या अनेक वर्षाची इच्छा आज तब्बल अकरा राष्ट्रीय महामार्ग देवून ना.पंकजाताई यांनी पुर्ण केली आहे. ग्रामीण भागामध्ये जिथे आजपर्यंत कधी विज पोहंचली नाही अशी गावे गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या माध्यमातून उजळून निघाली आहेत.गावात शुध्द पिण्याचे पाणी यासोबतच गावा अंतर्गत असलेले रस्ते करण्यात आल्याने गावकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.गोर गरीब शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना सुसज्ज करण्याचे कामही ना.पंकजाताई यांनी केले. नेहमीच जाती धर्माच्या नावाखाली या ग्रामीण भागाच्या विकासाला दुर ठेवण्याचे काम ज्या विरोधकांनी केले, कायम या ग्रामीण जनतेला भुलवण्याचे काम केले ती ग्रामीण जनता आज जातीपातीपासुन दुर गेल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले आहे. खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सातत्याने ग्रामीण भागाच्या जनतेशी आपला सुसंवाद कायम ठेवला. त्यांचे छोटे छोटे प्रश्‍न ऐकुन घेतले, आरोग्याच्या सुविधा निर्माण करून महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाखभर रूग्णांना आरोग्य सुविधा मोफत देण्याचे काम खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले. उसतोड कामगार असतील,शेतकरी शेत मजुर असती, नौकरदार वर्ग असेल या महिलांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी संसदेत आवाज त्यांनी उठवला. त्याचा फायदा आज हजारो लाखो महिलांना होत आहे. ग्रामीण भागाच्या समस्या सोडवत असतांना शहरी भागावरही खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी स्वत:ची नजर कमी होवू दिली नाही. व्यापारी,तरूण,हज यात्रेकरू यांना विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढावा लागतो, त्यासाठी पुणे,मुंबईचे खेटे मारून देखील आर्थिक झळ आणि वेळ मोठ्या प्रमाणावर वाया जात होता. जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करून या सर्वांचा फायदा खा.मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा वासीयांना झाला. जिल्हा वासीयांना रेल्वेची ओढ लागली आहे,विरोधकांनी रेल्वेचे राजकारण करत गेली अनेक दशके जिल्ह्याच्या जनतेला झुलवत ठेवले. हे स्वप्न साकार करण्याचे काम खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे. मुंडे साहेबांच्या या लेकींनी वडिलांचा वसा आणि वारसा चालवत कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही,उलट पक्षी या जिल्ह्याच्या जातीपातीच्या घाणेरड्या राजकारणाला मुठ माती देण्याचे काम करत सर्व जाती,धर्म,पंथाच्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेकीने प्रयत्न केले. त्यांच्या या नेकीच्या राजकारणाला बीड च्या जनतेने एकीचे बळ दिले आहे.आज लोकसभा मतदार संघात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पाठीशी बीड जिल्ह्यातील जनतेचे एकीचे बळ दिसुन येत आहे. या मुंडे साहेबांच्या लेकींच्या पाठीशी असणारे जनतेचे एकीचे बळ हे त्यांच्या नेकीच्या राजकारणामुळेच आहे.
comments