सर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे


मराठी माणसाला उद्योग करता येत नाही असा समज आपल्या मराठवाडयात व त्यातल्या त्यात बीड सारख्या सदा दुष्काळाच्या सवाटाखाली असलेल्या भागात सर्वत्र पहावयास मिळतो मात्र याला आपवाद ठरवले असेच म्हणावे लागेल ते कुटे गृपचे संस्थापक,ज्ञानराधा मल्टीस्टेटचे स्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांनी यशस्वी उद्योगाची उभारणी त्याला कष्टाची जोड व चांगल्या लोकाचा संपर्क याच्या जोरावर आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण भारतात नावारूपाला आले आहेत..त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादाी आहे..त्यांचा आज वाढदिवस सरांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..
एक सामान्य कुंटूबात जन्मलेले सुरेश कुटे यांनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अनेक छोटेमोठे व्यवसाय केले वडिलोपार्जित असलेल्या हिलाल चौकातील कापड दुकानदारीच्या व्यवसायात त्यांनी हातभार लावायला सुरवात केली..यातूनच त्यांच्यातील उद्योगशिलतेला चालना मिळाली.बीड जिल्हयात सर्वात जास्त कपाशी कापसाचे उत्पादन घेतले जाते यावर आधारीत त्यांनी व्यवसाय सुरू केला.सुरवातीला कॉटन प्रेसीग,जिनीग या व्यवसायात त्यांनी आपले नाव कमावले..अनेक राज्यात त्यांच्या या व्यवसायाच्या माध्यमातून संपर्क आला व बहेरील राज्यातील मोठाले उद्योग कसे उभे राहता यांचा त्यांनी आभ्यास केला..
जिनिग च्या व्यवसायात येत असलेल्या बॅकीगच्या आडचणी ओळखून त्यांनी बॅकिंग क्षेत्रात पदार्पण केले ज्ञानराधा नावाची मलटिस्टेट काढून अनेक तरूणहोतकरूना रोजीरोटीस लावले..त्यांच्या वडलाचे नाव ज्ञानोबा व आईचे नाव राधा या नावावरू ज्ञानराधा नावाची मलटीस्टेट कॉपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली आज घडीला या सोसायटीचा र्टनओव्ह ५०० कोटीच्या पुढे आहे.. परराज्यात व महाराष्ट्रात मिळून ४० च्या व शाखा बॅकीगची सेवा सर्वसामान्याना देत आहेत.या शाखाचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक व सर्वसामान्य डोळयासमोर ठेवून हे करत आहेत..
आर्थात या उद्योग उभारणीत त्यांना मोलाची साथ मिळत आहे ती त्यांची पत्नी आर्चना कुटे,बंधू सदाशीव कुटे यांची यातून योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेवून पुढील काळात त्यांनी कुटे गृपची स्थापना केली व या गृपच्या माध्यमातून तिरूमला ऑईल रिफायनी या उद्योगाची उभारणी केली या तिरूमला ऑईल मिलच्या माध्यमातून त्याची संपूर्ण भारतभर ओळख निमार्ण झाली आहे..त्यांची पत्नी आर्चना कुटे या ही उच्च शिक्षा विभूषीत आहेत त्यांच या आईल मिलचा संपूर्ण कारभार पहातात.या आईलमिलमध्ये तयार होणारे उत्पादन उत्त्म दर्जाचे खाद्यातेल या ऑईल मिलच्या माध्यमातून तयार होत आहे व त्यांवरची प्रोसिसिग,पॅकीग ही या बीड येथील प्लॅटमध्येच केली जाते या आईल मिलच्या माध्यमातून अनेक सुशिक्षीत बेरोजगाराना रोजगारही मिळाला आहे..या आईल मिलचे इतर ठिकाणी ही मोठे प्लॅट उभे राहीले आहेत पनवेल येथे मोठा प्लॅट उभारला आहे त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई तेथून इतर देश विदेशात तयार होणारे उत्पादन वितरीत केले जात आहे..
लवकरच या कुटे गृपची गगन भरारी युरोप व अमेरिकेत ही होत आहे. अशा यशस्वी उद्योजगाला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य लाभो हि ईश्वर चरणी प्रर्थना व पुढील यशस्वी वाटचालीस खुपखुप शुभेच्छा..
शब्दाकंन
गणेश पोकळे
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)