बी.एस्सी संगणकशास्त्रमध्ये अनिल भोसले प्रथम तर आकांक्षा तौर व्दितीय

19-06-2017 : 04:03:55
     2133 Views

बीड/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्न बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात बी. एस्सी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाचा निकाल जाहिर झाला आहे. या अभ्यासक्रमामध्ये अनिल अजिनाथ भोसले हा विद्यार्थी ६४.५० टक्के मार्क घेवून प्रथम आला. असुन आकांक्षा गंगाधर तौर ६४.४७ टक्के व्दितीय तर दिनेश मोहन सुसलादे यांनी ६४.१७ टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे.
बी. एस्सी संगणकशास्त्र पदवीसाठी शैषणीक वर्षे २०१६-२०१७ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या परिक्षेत महाविद्यालयाचा एकुण ८० टक्के निकाल लागला आहे. या निकालानंतर विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमाचा प्रवेश कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी सन २०१७-२०१७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया सूरु असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. आणि आपले प्रवेश निश्चित करावेत. पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या एस.सी, एस.टी, एन.टी, ओबीसी अशा शिष्यवृत्ती धारक प्रवर्गातील विद्याथ्र्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती लागु आहे.
सदर महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर संगणक क्षेत्रात करिअर करु इच्छीणा-या विद्याथ्र्यांसाठी बी.एससी नेटवर्कींग आणि मल्टीमिडीया, बी.सी.एस, आणि बी.सी.ए पन्नास टक्के फिसमध्ये प्रवेश आहेत. यशस्वी झालेल्या विद्याथ्र्यांचे अभिनंदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीसीयुडीचे सदस्य तथा संस्थेचे अध्यक्ष रमेश पोकळे, सचिव प्रा. गणेश पोकळे, प्राचार्य विठ्ठल एडके, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार, प्रा. बप्पासाहेब हावळे, प्रा. विजय दहिवाळ, प्रा. छाया गडगे, प्रा.वैजिनाथ शिंदे, प्रा सुरेश कसबे, प्रा. अफ्रोज सय्यद, प्रा. कांबळे, सुहास गाढवे, सुधिर केंगार, संतोष मोरे, प्रविण पवार, जयदत्त गीरी यांनी अभिनंदन केले आहे.
comments