पत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमासाठी १० जुलै रोजी सीईटी

2017-06-19 11:54:28
     1911 Views

- सोमवारपासून ऑनलाईन अर्ज स्विकारणार
- प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक

बीड/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून (दि.१२ जून) सूरु होत असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. अशी माहिती प्रभारी प्राचार्य विठ्ठल एडके यांनी दिली.
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ऑनलाईन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ३ जुलै), हॉलतिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेश पूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अ‍ॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) या प्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय माने कॉम्पलेक्स बीड येथे तात्काळ संपर्क साधावा. असे अवाहन प्रभारी प्राचार्य विठ्ठल एडके यांनी केले आहे.
comments