वसंतराव काळे महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

2017-06-15 15:43:04
     1924 Views

बीड/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ग्रामिण भागातील विद्यार्थी केंद्रस्थानी मानून काही महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. यात सामाजिक शास्त्र विद्याशाखे अंतर्गत जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात कै. अण्णासाहेब पाटील सवाभावी संस्था संचलीत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात पदवी आणि पदव्यत्तर पदवी जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल एडके यांनी दिली.
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने निश्चित केल्या प्रमाणे प्रथमच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सीईटीसाठी नाव नोंदणे करणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सीईटीसाठी नाव नोंदणी करतील त्यांनाच एमए जनसंवाद आणि पत्रकारिता या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. तसेच बी.जे अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचा पदवी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतो. तसेच बी.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्याथ्र्यांना प्रवेश घेता येतो. दोन वर्षांचा एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्र केल्यानंतर शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात माहिती अधिकारी, चॅनलमध्ये रिपोर्टर, वृत्तपत्रात बातमीदार, उपसंपादक, वृत्तसंपादक, आकाशवाणी केंद्रावर निवेदक, निमसरकारी, सहकारी खासगी क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, माध्यम सल्लागार मुक्त पत्रकार, प्रकाशन अधिकरी, केंद्र शासनाच्या विविध विभागात आणि राज्य शासनाच्या विविध विभागात जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभागात जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषदेत संवाद तज्ञ आदी शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात रोजगाराच्या अगणित संधी आहेत. या शिक्षणानंतर विद्यापीठांतर्गत संशोधनाचे क्षेत्रही खुले होऊ शकते.
पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या एस.सी, एस.टी, एन.टी, ओबीसी अशा शिष्यवृत्ती धारक प्रवर्गातील विद्याथ्र्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती लागु आहे.
सदर महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर संगणक क्षेत्रात करिअर करु इच्छीणा-या विद्याथ्यांसाठी बी.एससी नेटवर्कींग आणि मल्टीमिडीया, बी.सी.एस, आणि बी.सी.ए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सदर अभ्यासक्रमाला विद्यापीठाने ठरवून दिलेल्या फिस मध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश महाविद्यालयात सुरु झाले असुन बारावी उत्तीर्ण विद्याथ्यांनी प्रवेशासाठी तात्काळ महाविद्यालयात नाव नोंदणी करुन प्रवेश निश्चित करावेत असे अवाहन प्रभारी प्राचार्य विठ्ठल एडके यांनी प्रसिध्दिपत्रकाव्दारे केले आहे
comments