माध्यमांमधील करिअर संधी

28-06-2017 : 11:42:39
     2687 Views

वेगाने वाढणा-या माध्यमविश्वात रोजगाराच्या आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या अनंत संधी आजच्या तरुणाईला उपलब्ध होत आहेत. वृत्तपत्रांचे संपादक, वृत्तवाहिन्यांचे वृत्तनिवेदक, पॅनेल चर्चांचे सूत्रधार, रेडिओ जॉकी हे या माध्यमांचे प्रतिनिधित्व करणारे ठळक व ग्लॅमरस चेहरे असले, तरी पडद्याआडून त्यांना माहितीचे बळ पुरवणारे आणि या माध्यमविश्वाचा डोलारा आपल्या अनामिक हातांनी पेलणारे पत्रकार आहेत.
माहिती देणे, रंजन करणे आणि शिक्षित करणे हे पत्रकारितेचे मुख्य काम. ते करण्यात निष्णात व्हायचे, तर भवताली घडणा-या घटनांबद्दलचे स्वाभाविक कुतूहल मनात हवे. माध्यमानुसार माहितीच्या सादरीकरणाचा बाज बदलतो. वृत्तपत्रांत ती लिखित भाषा असते, नभोवाणीत ती फक्त ध्वनिरूप असते, तर दूरचित्रवाणी वाहिनीत तो दृक्-श्राव्य आविष्कार असतो. इंटरनेट आणि मोबाईल आधारित साधनांवर हे डिजिटल सादरीकरण बहुढंगी होते. त्यामुळे त्या त्या माध्यमाची भाषा समजणे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानावर स्वार होण्याचे आव्हानही पत्रकारापुढे असते. हे करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांच्यासाठी अनंत संधींचे माध्यमविश्व खुले आहे. आजच्या काळातली पत्रकारिता करायची, तर त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण हवेच. आधीच्या अनेक पिढ्यांमधली पत्रकारिता कदाचित स्वतःच शिकून करावयाची होती. त्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण ही पूर्वअट नव्हती. आता मात्र ती नक्कीच आहे. अशा प्रगत आणि आधुनिक पत्रकारितेचे शिक्षण देणा-या अनेक संस्था महाराष्ट्रात आणि देशात आहेत. विदेशी विद्यापीठांमध्येही त्यातील उच्च शिक्षणाच्या संधी व पाठ्यवृत्ती उपलब्ध आहेत. पत्रकारिता आणि माध्यमांचे हे शिक्षण दोन पातळ्यांवर उपलब्ध आहे. पहिले बारावीनंतर पदवी शिक्षण आणि दुसरे पदव्युत्तर अभ्यासक्रम. वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय पत्रकारितेचे बारावीनंतरचे अभ्यासक्रम आहेत.
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची समज अद्याप पुरेशी विकसित झालेली नसते. त्यामुळे बातमी लिहिण्याचे तंत्र त्यांना साधले, तरी बातम्यांची निवड, अग्रक्रम आणि व्यक्ती-समाजावरील त्याच्या परिणामांबाबतची सजगता यायची असते. औपचारिक शिक्षण घेतल्यानंतरही पत्रकारितेत सतत शिकत राहावे लागते. त्यामुळे जेवढ्या लवकर पत्रकारितेच्या प्रत्यक्ष पाण्यात उतरू, तेवढे बरे, असे मानणा-यांचाही एक गट आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर पत्रकारिता आणि माध्यमांमध्ये जेवढ्या संधी उपलब्ध आहेत,
मास्टर्स इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन (एमजेएमसी) हा पदव्युत्तर दोन वर्षांचा अभ्यासक्रम वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय उपलब्ध आहे. बातम्यांचे लेखन, संपादन, वृत्तलेख लेखन या वृत्तपत्रीय कामासाठी अत्यावश्यक गाभ्याच्या विषयांबरोबरच नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नवमाध्यमांसाठी आवश्यक कौशल्यांचे शिक्षणही त्यात दिले जाते. जाहिरात, जनसंपर्क अशा माध्यमांशी संबंधित इतर विषयांबरोबरच संज्ञापन व माध्यमविषयक सिद्धान्तांची ओळखही अभ्यासक्रमात करून दिली जाते.
पत्रकारितेच्या शिक्षणात सैद्धान्तिक ज्ञानाबरोबर (थिअरी) प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभवांनाही मोठे महत्त्व आहे. त्या दृष्टीने विद्याथ््रयांचे प्रायोगिक प्रकाशन, रेडिओ- टीव्हीसाठीचे बुलेटिन तयार करण्याची संधी विद्याथ््रयांना असते. वृत्तपत्रांबरोबरच इतर माध्यमांमध्ये इंटर्नशिप म्हणजे प्रत्यक्ष कार्यानुभवाची संधीही विद्याथ््रयांसाठी मोलाची असते. माध्यम संशोधन हेदेखील वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. त्यामुळे संशोधन पद्धती व लघुशोधप्रबंध प्रकल्पांचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. नव्या अभ्यासक्रमात त्याला सखोल वार्तांकन अहवालाचा पर्याय देण्यात आला आहे. पत्रकारितेच्या अशा कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय संकेतस्थळांवर पाहावेत आणि त्यांचा अभ्यास करूनच प्रवेशाबाबतचा निर्णय घ्यावा.
पत्रकारितेतील संधींची माध्यमांच्या प्रकारानुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार वर्गवारी केली जाते. मुद्रित माध्यमे म्हणजे वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तक प्रकाशन इत्यादी. प्रत्यक्ष घटनास्थळावर हिंडून माहिती गोळा करणारा बातमीदार आणि वृत्तपत्रात आलेल्या अशा बातम्यांवर संपादन करणारा उपसंपादक अशी ठळक वर्गवारी वृत्तपत्रांमध्ये दिसते. कोठूनही संधी मिळाली, तरी संपादक होण्यापर्यंतचा प्रवास प्रत्येकाच्या क्षमतेवर अवलंबून असतो. देशात सध्या इंग्रजी वृत्तपत्रांबरोबरच मराठीसारख्या प्रादेशिक वृत्तपत्रांच्या व्यवसायवाढीचा आलेख चढता आहे. थोडक्यात सांगायचे, तर गेल्या दशकात देशातील माध्यमांच्या वाढीचा वेग राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या साधारण दुप्पट राहिला आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे नव्या संधींबरोबर वृत्तपत्रे बदलण्याचा प्रवाह माध्यमांमध्येही आल्याने नवनव्या संधी सतत तयार होत असतात. पत्रकारितेचे शिक्षण घेऊन नव्यानेच व्यवसायात येणा-या तरुणांपुढे विविध संधींचा पट त्यामुळे खुला राहतो.
एफएम रेडिओ वाहिन्यांचा गेल्या काही वर्षांत प्रसार झाल्याने तेथेही रेडिओ जॉकी म्हणून कामाच्या संधी उपलब्ध आहेत. आकाशवाणीसाठी प्रासंगिक वृत्तनिवेदकाच्या संधी आहेत. मात्र त्या पुरेशा प्रमाणात नाहीत. याउलट देशात दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांचा प्रसार वेगाने होत आहे. त्यासाठीची योग्य कौशल्ये आत्मसात केल्यास इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक वाहिन्यांवरही कामाच्या मुबलक संधी उपलब्ध होत आहेत. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर वृत्तनिवेदक, चर्चांचा सूत्रधार आणि घटनास्थळावरून माहिती देणारा बातमीदार हे लोकांच्या नजरेत भरत असले, तरी वृत्तवाहिन्यांमध्ये तुमच्या कौशल्यानुसार पत्रकारितेशी संलग्न इतरही अनेक संधी उपलब्ध असतात. इनपुट, आऊटपुट डेस्क, व्हिडिओ एडिटर, संशोधक अशा या जागा आहेत.
याशिवाय इंटरनेट आणि मोबाईलच्या प्रसारामुळे त्यावर आधारित नवमाध्यमांमध्ये कामाच्या असंख्य संधी माध्यमाच्या विद्याथ््रयांसाठी खुल्या होत आहेत. नव्याने सुरू होणा-या संकेतस्थळांसाठी पूरक आशयाची निर्मिती (कंटेंट प्रोव्हायडर), संकेतस्थळांची मांडणी व व्यवस्थापन, ऑनलाइन प्रसिद्धी असे सतत विकसित होणारे विश्व भोवंडून टाकणारे आहे.
जाहिरात आणि जनसंपर्काच्या माध्यमांशी आनुषंगिक क्षेत्रातही माध्यमांच्या विद्याथ््रयांना भाग्य अजमावता येऊ शकते. याबरोबरच प्रस्थापित माध्यमांमध्ये काही वर्षे अनुभव घेऊन मुक्त पत्रकारिता आणि स्वतःचा माध्यमकेंद्री व्यवसाय सुरू करणा-यांकडेही अनेकांचा कल आहे. त्यामुळे प्रस्थापित माध्यमांमधली नोकरी एवढी एकच रोजगाराची वाट आता पत्रकारितेच्या विद्याथ््रयांपुढे नाही. माध्यमांच्या बदलत्या स्वरूपामुळे आता एकाच एका माध्यमासाठी काम मर्यादित राहिलेले नाही. वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही आणि नवमाध्यमे अशांचा मेळ घालत बहुमाध्यम पत्रकारितेचा प्रवाह जोरकसपणे पुढे येताना दिसतो आहे. या सर्वांचे भान पत्रकारितेतल्या उगवत्या पिढीला राखणे भाग पडत आहे. ही पिढी अतिशय उत्साही आणि सतत नवनवीन शिकण्यास उत्सुक असल्यामुळे तंत्रज्ञानावर स्वार होत मल्टिटास्किंग’ चे कौशल्य ती तितक्याच वेगाने आत्मसात करत आहे.
सॉफ्टवेअर, अभियांत्रिकी, डॉक्टरकी अशा इतर क्षेत्रांसारखा विपुल पैसा पत्रकारितेत प्रारंभी नाही. त्यामुळे सुरवातीला संबंधित वृत्तपत्र किंवा माध्यमसंस्थेची स्थिती आणि गतीनुसार मिळणारे पॅकेज हिरमुसले करणारे ठरू शकते. हे दिवस कसोटीचे असतात. परंतु विविध मार्गांनी समाजासाठी उपयोगी पडण्याची संधी या क्षेत्रात निश्चितच असते.
पत्रकारितेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सतत शिकत राहण्याची आणि बदलत्या जगाबरोबर स्वतःला अद्ययावत राखण्याची संधी इथे असते. सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून सत्ताधा-यांबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटण्याची व त्यांना रोखठोक प्रश्न विचारण्याची संधी इथे असते. त्यातून थोडेसे सेलिब्रिटीपण पत्रकारांच्या वाट्यालाही येते. ते डोक्यात जाऊ न देता, हे ज्यांच्यासाठी आहे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकार हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि संवादाचे कौशल्य ही पत्रकाराची शिदोरी असते. ती नीट वापरली, तर कोणत्याही वादळवा-यांमध्ये पाय रोवून उभे राहण्याची आणि इतरांना आधार देण्याची ताकद व हिंमत पत्रकारच दाखवू शकतो. ज्यांना स्वतःबद्दल असा विश्वास आहे, अशांचे पत्रकारिता आणि माध्यमांच्या विश्वात स्वागत आहे. १२ वी पास विद्याथ््रयांसाठी बी.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता तर पदवी उत्तीर्ण विद्याथ््रयांसाठी एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत.
संपर्क - वसंतराव काळे पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालय, बीड, ९५५२५५६३९७ ९५२७८१५१५१ ७४२०९०४०५५
comments