महात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके

2017-04-11 14:08:29
     1716 Views

बीड / प्रतिनिधी
महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजाला विद्येचे महत्त्व पटवून देताना तत्कालीन जोखडातून मुक्त करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले होते. महात्मा फुले यांच्यामुळेच आज मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. असे प्रतिपादन प्र. प्राचार्य विठ्ठल एडके यांनी केले.
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रचार्य विठ्ठल एडके बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रा. वैजिनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य एडके म्हणाले, ब्रिटिश सरकारने व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांच्या काळात भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची नियुक्ती केली होती. या पहिल्या केंद्रीय शिक्षण आयोगात अध्यक्षांखेरीज २०सभासद होते. त्यातील ८ भारतीय होते. महात्मा जोतीराव फुले यांनी १९ ऑक्टोबर १८८२ रोजी या आयोगापुढे साक्ष दिली. त्यात त्यांनी किमान १२ वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे अशी मागणी केली होती. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातून अशी मागणी करणारे पहिले द्रष्टे शिक्षणतज्ञ म्हणून महात्मा ज्यांतीबा फुले यांचे नाव घ्यावे लागते. त्यानंतर १२८ वर्षांनी सरकारने ही मागणी मान्य केली. आज रोजी भारत सरकारने शिक्षण हक्क कायदा लागू केला. ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींना शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक करण्यात आले. याचे सर्व श्रेय हे महात्मा ज्यातीबा ़फुले यांनाच जाते.
यावेळी प्राचार्य एडके म्हणाले, शेतकर्‍याचा असूड या ग्रंथात १८८३ साली केलेल्या सुचना आजही मार्गदर्शक आहेत. शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री फुले मांडून दाखवतात. उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे. शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत. शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक र्‍यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते.शेतकर्‍याचा असूड या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. शेतकरी सुखी व्हायचा असेल धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत. शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक र्‍यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. शेतकर्‍याचा असूड या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. या घरातून त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी केली. शेती परवडत नाही म्हणून आजवर देशातील लाखो शेतकर्यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत. १४० वर्षांपुर्वी त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे शेतकर्‍याचा असूड मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते. आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलावतळी,धरणे बांधून शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता. अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरूपच जणू ते दाखवित होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रा.विजय दहिवाळ, प्रा. बप्पासाहेब हावळे, प्रा. छाया गडगे, प्रा. शेख, प्रा. सुहास गाढवे, प्रविण पवार, जयदत्त गिरी आदीसह विद्यार्थि, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
comments