गारपीट व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत- नवल किशोर राम


नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

बीड : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचे यंत्रणांनी तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

बुधवारी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच काही भागात गारपीट झाली. या पार्श्वभूमीवर संबंधित नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परळी तालुक्याचा दौरा केला. त्यांनी गोवर्धन हिवरा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या ज्वारी पिकाच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर खारी तांडा येथील पिकांच्या नुकसानीची तसेच पडझड झालेल्या घरांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची तसेच इमारतींची पाहणी केली.

यावेळी सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांनी दिलासा दिला. सर्व नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल व नियमानुसार सर्व नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल, असे सांगितले. कृषी व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सर्व पंचनामे करण्याबरोबरच गारपीट व वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना होऊन मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत देण्यात यावी, असे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार विद्याचरण कडवकर तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.




comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)