दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम जारी


बीड, दि.२३:- जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा माहे फेब्रुवारी व मार्च, २०१७ मध्ये होत असून परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडचे जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये केंद्र व त्याच्या २०० मीटर परिसरात दि. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ पर्यंत इयत्ता बारावी व दि.७ मार्च ते १ एप्रिल २०१७ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा असल्याने बीड जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम जारी केला असून परीक्षा केंद्राच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण, संदेश वहन साधने तसेच कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास, एस.टी.डी,आय.एस.डी मशिन, ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीतील परीक्षा केंद्रावर दि.२८ फेब्रुवारी ते १ एप्रिल २०१७ या कालावधीत त्या-त्या दिवशीच्या परीक्षेच्या वेळेच्या एक तास अगोदर ते परीक्षेचा पेपर संपेपर्यतच्या कालावधीसाठी व परीक्षा साहित्य ठेवलेल्या ठिकाणी कायम लागू राहतील. असे जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)