बीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन


बीड, दि.२३ :- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यातील खालापुरी, नाळवंडी व पिंपळनेर या गावांमध्ये प्रत्यकी दोन दिवशीय माता-बाल आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची तसेच सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रजनन, माता, नवजात शिशू, बाळ आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी शिरुर तालुक्यातील खालापुरी येथे दि.२७ व २८ फेब्रुवारी २०१७, बीड तालुक्यातील नाळवंडी येथे दि.३ व ४ मार्च २०१७ तर बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे दि.८ व ९ मार्च २०१७ रोजी या राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे
तीनही गावांमध्ये पहिल्या दिवशी आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग तसेच शाळा महाविद्यालयाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, सकस आहार स्पर्धा तसेच सुद्दढ बालक स्पर्धा घेण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी गावात आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत पदधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थ, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मुख्य कार्यक्रमाद्वारे आई-बाळाचे आरोग्य, किशोरवयीन मुलांचे आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान या विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमात विविध विभांगाचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. तसेच मनोरंजनाच्या माध्यमातूनही आरोग्याची माहिती देण्यात येणार आहे. सायंकाळी विविध जनजागृतीचे लघु चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. अशी माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी दिली.
मुख्य कार्यक्रमास बीड तालुक्याचे आमदार जयदत्त क्षीरसागर, गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, खालापुरी गावच्या सरपंच द्रोपदाबाई मुंडे, नाळवंडींच्या सरपंच अर्चना जाधव तर पिंपऴनेरच्या चद्रभागाबाई गणगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कासट, डॉ.राजेश तांदळे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास आठवले, डॉ. बेग व डॉ.चौरे, महिला व बाल विकास अधिकारी वैभव जाधव आणि बांगर, मुख्याध्यापक सोनसळे, यादव तसेच मुख्याध्यापक प्रकाश राठोड, महिला बालकल्याण विभागाच्या प्रवेक्षिका, अंगणवाडी आणि आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ता आदी उपस्थित राहणार आहेत. असे माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी कळविले आहे.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)