बालाघाटाच्या जनतेची सेवक म्हणून काम करीन - सौ. सारिका पोकळे

2017-02-15 11:28:57
     1096 Views

नेकनूर/प्रतिनिधी

बालाघाटावरिल सर्वसामान्य जनता विकासापासून वंचित आहे. गावांची व गोरगरीब लोकांची कामे होण्यास अडचण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नेकनूर गटात जनतेने काम करण्याची संधी दिली तर पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आमदार संगीता ठोंबरे आणि जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली बालाघाटाच्या जनतेची सेवक म्हणून काम करणार असल्याची ग्वाही नेकनूर जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ. सारिका रमेश पोकळे यांनी दिली.
नेकनूर जिल्हा परिषद गटात विविध ठिकाणी प्रचारार्थ सौ. सारिका रमेश पोकळे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी सौ. सारिका पोकळे म्हणाल्या की, नेकनूर परिसारातील ग्रामिण भागातील रस्त्याची अतिशय दयनीय आवस्था झाली आहे. या रस्त्यावर चालतासुध्दा येत नाही. हे रस्ते अतिशय महत्त्वाचे असून याकडे पूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष दिले नाही.
याबरोबरच नेकनूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील रस्ते, नाल्या, पिण्याचे शुध्द पाणी, दिवाबती, आरोग्य अशा मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले नाही. आपण या सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देऊ. पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, आमदार संगीता ठोंबरे आणि जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करुन देवू. तसेच मतदारसंघातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात सोबत घेउन काम करणार असल्याचेही सारिका पोकळे म्हणाल्या.
नेकनूर येथील शासकीय महिला दवाखान्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महिला बचत गटांना विविध उद्योग व्यावसाय उभारण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई यांच्याकडे पाठपूरावा करणार असल्याचे सारिका पोकळे यांनी स्पष्ट केले.
comments