नेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे

2017-02-15 11:26:56
     1825 Views

नेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे
नेकनूर/प्रतिनिधी
नेकनूर गटातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी खेचून आणून या गटात राबवून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले.
नेकनूर जिल्हा परिषद गटातील भाजपांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, राज्यात देवेंद्रजी फडणवीस ेव ना.पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे व जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे नेकनूर जिल्हा परिषद गटात विकासाची कामे खेचून आणून या गटात विकास योजना राबविणार आहे. त्यासाठी नेकनूर जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ सारिका रमेश पोकळे, नेकनूर पं.स.चे उमेदवार पठान फहेमीद महेबुब खान आणि मांजरसुबा पं.स.च्या उमेदवार सौ वैशाली प्रदिप चौरे यांना मतदानरूपी आशीर्वाद द्या. आजपर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली आहे., एकवेळेस नेकनूर जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ सारिका रमेश पोकळे, नेकनूर पं.स.चे उमेदवार पठान फहेमीद महेबुब खान आणि मांजरसुबा पं.स.च्या उमेदवार सौ वैशाली प्रदिप चौरे यांना संधी द्या. तुम्ही दिलेली संधी कधीही वाया जाऊ देणार नाही. असे ेमाजरसुबा येथे युवकांच्या बैठकीत रमेश पोकळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी रमेश पोकळे म्हणाले, पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, आमदार संगीता ठोंबरे यांच्या माध्यमातुन बालाघाटावरील तरुणांना आणि शेतकर्यांना जोडधंदा म्हणून दूध डेअरी प्रकल्प उभारून गायी-म्हशींचे वाटप करणार, सोयाबीन प्रकिया उद्योग उभारून युवकांना रोजगार मिळवून देणार, क्रीडापटू तसेच क्रीडाप्रेमींसाठी क्रीडा संकुलाची उभारणी करणार, नदीवर बंधारे उभारणार, प्रत्येक गाव अंधारमुक्त करण्यासाठी गावोगावी पथदिव्यांची सुविधा पुरवणार, जि. प. गटातील सर्व रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण करणार, एमपीएससी व यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र सुरू करणार, गटातील सर्व शाळा डिजिटल करणार, महिला बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना उभारणार, यासाठी भाजपच्या नेकनूर जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ सारिका रमेश पोकळे, नेकनूर पं.स.चे उमेदवार पठान फहेमीद महेबुब खान आणि मांजरसुबा पं.स.च्या उमेदवार सौ वैशाली प्रदिप चौरे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन रमेश पोकळे यांनी केली.
comments