सारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे

2017-02-13 13:22:13
     1762 Views

गरीबांना विकासाचा घास भारवण्यासाठीच ही निवडणूक लढवत आहे-रमेश पोकळे
बीड दि.१२ प्रतिनिधी - गेल्या पंचवीस वर्षापासून एका सर्वसामान्य कुटूंबातील रमेशभाऊ पोकळे हे समाजकारण आणि राजकारण करत आहेत. गोर-गरीब जनतेशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी बालाघाटावर कोट्यावधीचा निधी खेचून आणला आहे. आगामी काळात रमेशभाऊ पोकळे यांचे हात बळकट करून सारीकाताई पोकळे त्याचबरोबर नेकनूर पं.स.गणाचे उमेदवार फहेमीद खान पठाण, मांजरसुंबा पं.स.गणाचे उमेदवार वैशालीताई प्रदिप चौरे यांना विजयी करा त्यांच्या विजयाने विकासगंगा आपल्या दारात येणार असल्याचे प्रतिपादन आ.संगिताताई ठोंबरे यांनी केले तर या बालाघाटावरच्या गोर-गरिब जनतेची गेल्या अनेकवर्षापासून दिशाभूल करून त्यांच्या मतावर निवडूण येवून स्वतःचा विकास करून घेणा-या लोकांनी या गरिबांच्या तोंडचा घास काढला आहे. मात्र मी या बालाघाटावरच्या जनतेला त्यांच्या तोंडचा काढलेला विकासाचा घास भरवण्यासाठी आणि अशा पापी लोकांना बाजूला करण्यासाठीच या निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले.
भाजपाच्या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज बाजाराचा दिवस असल्याने नेकनूरमध्ये पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सर्वचा राजकीय पक्षांनी प्रचार फे-या काढल्या होत्या मात्र भाजपाच्या प्रचार फेरीस उत्सफूर्त प्रतिसाद मिळाल्याने ईतर पक्षांना मात्र प्रचार फे-या उरकून घ्याव्या लागल्या दोन ते अडीच तास नेकनूरमध्ये हजारो नागरिक सहभागी झाल्याने आजची प्रचार फेरीही विजयाची प्रचारफेरी असल्याची चर्चा नागरिकांमधून होत होती, सारिकाताई पोकळे यांच्या या प्रचार फेरीने नेकनूर भाजपमय झाले आहे. या प्रचार फेरीस आ.संगिताताई ठोंबरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,केज नगर परिषदचे गट नेते हरून ईनामदार, नेकनूर ग्रा.प.चे गट नेते दयानंद निर्मळ, सरपंच शेख अर्शद अन्वर,उपसरपंच बिभिषण शिंदे, ग्रा.पं.सदस्य अमित देशमुख, कैलास गनगे,जबीभाई,रहिमभाई, बबलू सर, अरविंद निर्मळ,मुजीब अतार, जमील मनीयार,जिया शेख, सल्मानभाई, गणेश पूजारी,प्रविण पवार,अमजत पाशा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ.संगिताताई ठोंबरे म्हणाल्या की, कोणतेही राजकीय पद नसताना ज्या रमेश पोकळेनी याभाागात चोवीस कोटी रूपये विकास कामासाठी आणले त्या रमेश पोकळेंना आपण विजय केल्यानंतर या बालाघाटाचा विकास करण्यासाठी किती रूपये आणू शकतात याचा आपण विचार करायला हवा. नेकनूरची जनता ही स्व.गोपीनाथाराव मुंडे यांच्यावर जेवढं प्रेम करत होती तेवढेच प्रेम ना.पंकजातार्इंवर करत आहे त्यामुळे सारीकातार्इंचा विजय हा निश्चित असून आपण सर्व त्यांना विजयी करणार यात मला कोणतीही शंका नाही असे त्या म्हणाल्या. यावेळी पुढे बोलतांना रमेश पोकळे म्हणाले की, या भागात आपण निवडून दिलेला प्रतिनिधी नेहमी म्हणतात की आम्ही नेकनूरची बारामती करू बारामती तर काही झाली नाही परंतू या नेकनूरची भानामती यांनी करून ठेवली आहे. मी कोणावर खालच्या पातळीची टिका करत नाही, मला त्याची गरजही नाही कारण आज निघालेल्या भव्य-दिव्य रॅली बघून बालाघाटाची जनता विकास करणारांसोबत असल्याचे सर्वांनीच बघीतले आहे. या भागातील लोक ना.पंकजातार्इंसोबत आहेत हे सर्वांच्या लक्षात आले आहे. एखादा जिल्हा परिषद सदस्य याने मनावर घेतले तर या भागाचे नंदनवन होऊ शकले असते पण यांची ईच्छाशक्ती विकास कामे करण्याची नसून खाण्याची वृत्ती आहे अशा वृत्तींना बाजूला सारून विकासाची गंगा झोपडीपर्यंत आणणा-या ना.पंकजातार्इंचे हात आपण बळकट करावेत आणि भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हरूनभाई ईनामदार, चौसाळा जि.प.गटाचे उमेदवार बाळासाहेब मोरे, नेकनूर पं.स. चे उमेदवार फहेमीदखान पठाण, अशोक रसाळ यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्तावीक जितेंद्र शिंदे यांनी केले तर आभार जिया शेख यांनी मानले.
प्रचार फेरीस आणि सभेस मोठ्या संख्येने नागरिक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
comments