नेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा

2017-02-07 17:23:04
     1632 Views

पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थित राहून विकास पर्वात सहभागी व्हावे-रमेश पोकळे

बीड प्रतिनिधी दि.७ फेब्रु. २०१७ :-
बीड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या जि.प. आणि पं.स.च्या सर्व उमेदवारांच्या व नेकनूर जि.प.गटाचे उमेदवार सौ.सारीका रमेश पोकळे तसेच नेकनूर-पंचायत समितीचे उमेदवार फहेमीद खान पठाण व मांजरसूंबा पंचायत समितीचे उमेदवार सौ.वैशाली प्रदिप चौरे या भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे पाटील यांची नेकनूर परीसरात असणार्‍या तांदळवाडीघाट येथे बुधवार दुपारी ठिक ३:३० वा. प्रचंड जाहिर संभा होणार असून यासभेस पंचक्रोशीतील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून विकास पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले.
बीड तालुक्यात तसेच नेकनूर जि.प.आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पार्टीने चांगलीच आघाडी घेतली आहे, बालाघाटावर भाजपाचे कमळ चर्चेचा विषय आहे. आज बीड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या सर्व उमेदवार तसेच नेकनूर जि.प.गटाच्या उमेदवार सौ.सारीका रमेश पोकळे, नेकनूर-पंचायत समितीचे उमेदवार फहेमीद खान पठाण व मांजरसूंबा पंचायत समितीचे उमेदवार सौ.वैशाली प्रदिप चौरे या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बालाघाटाचा परीसर पिंजून काढला आहे. या तीनही उमेदवारानी प्रत्यक्ष भेटी-गाठीवर भर दिला असून त्यांच्या या गाठी-भेटीने नागरीकांत समाधान व्यक्त केले जात आहे. इतर पक्षाच्या तुलनेत भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार सर्वस्तरावर आघाडीवर आहे. त्यातच आज बुधवार रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे पाटील यांची नेकनूर परिसरातील तांदळवाडी घाट येथे प्रचंड मोठी जाहिर सभा होत आहे. दुपारी ३:३० वा. ही सभा होणार आहे. खा.रावसाहेब दानवे पाटील या परीसरात येणार असल्याने भाजपाच्या उमेदवारांचे पारडे निश्चितच जड होणार आहे.
या जाहिर सभेस पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थित राहून विकास पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले आहे.
comments