रमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद

2017-02-03 19:04:20
     1607 Views

हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या नेकनूर येथील प्रसिध्द हजरत शेख शहा इब्राहिम दर्गा साहेब यांना चादर चढवून रमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद.
नेकनूर जिल्हा परिषद गटाचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रमेश भाऊ पोकळे यांनी नेकनूर येथील वर्षानुवर्षचे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या दर्गा साहेब येथे जाऊन चादर चढवली तसेच नेकनूरच्या विकासासाठी व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी कटीबध्द राहील असाही शब्द दिला. मुस्लीम समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच मुस्लीम श्रध्दास्थानांच्या विकासासाठी भरीव निधी आणून तिर्थ क्षेत्र विकासाचा दर्जा देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे रमेश भाऊ पोकळे यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून न सुटलेल्या मुस्लीम समाजातील अनेक अडीअडचणी यामध्ये शादीखाना,दफनभूमी त्याचबरोबर मुस्लीम बहुल भागात मुलभूत सोई -सुविधा पुरवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समितीचे उमेदवार फैमिद खान पठाण, मांजरसुंबा पं.स. चे उमेदवार सौ.वैशाली प्रदिप चौरे, भाजपाचे जेष्ठ नेते दयानंद निर्मळ, सरपंच अर्शद अन्वर, उपसरपंच बिभीषण शिंदे,ग्रां.प.स. कैलास गणगे, हनुमान चाळक, प्रशांत वाळके,अमित देशमुख, स्वप्नील कुलकर्णी, जब्बार कुरेशी,शेख जिया,बजरंग गायकवाड, विकास आनवणे आशेक हजारे, सुभाष हजारे, सुसेन डोझ्फोडे, दत्ता पवार, भगवान अनवने, महादेव हजारे, बिभिषण मोरे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
comments