२६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल; आचारसंहिता लागू


संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबईसह १० महापालिकांच्या आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील १० महापालिकेच्या निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान १६ फेब्रुवारीला, तर दुस-या टप्प्याचं मतदान २१ फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात १० जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

पहिल्या टप्प्यात हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, वर्धा, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे.

दरम्यान, २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, महापालिका निवडणुकांसाठी १९ फेब्रुवारीला संध्याकाळी ५.३० वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही. तसेच न्यायालयाच्या स्थगितीमुळे नागपूर महापालिकेचा निवडणूक कार्यक्रमात समावेश करण्यात आला नाही.

१० महापालिका

१) मुंबई, २) पुणे, ३) पिंपरी चिंचवड, ४) ठाणे, ५) उल्हासनगर, ६) नाशिक, ७) नागपूर, ८) अकोला, ९) अमरावती, १०)सोलापूर

२५ जिल्हा परिषदा

१) रायगड, २) रत्नागिरी, ३) सिंधुदुर्ग, ४) पुणे, ५) सातारा, ६) सांगली, ७) सोलापूर, ८) कोल्हापूर, ९) नाशिक, १०) जळगाव, ११) अहमदनगर, १२) अमरावती, १३) बुलढाणा, १४) यवतमाळ, १५) औरंगाबाद, १६) जालना, १७) परभणी, १८) हिंगोली, १९) बीड, २०) नांदेड, २१) उस्मानाबाद, २२) लातूर, २३) वर्धा, २४) चंद्रपूर, २५) गडचिरोली

असा असणार निवडणुकांचा कार्यक्रम

११ जानेवारी २०१७ पासून आदर्श आचारसंहिता लागू

२७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार

४ फेब्रुवारीला निवडणूक अर्जाची छाननी होऊन अर्ज मागे घेता येणार

५ फेब्रुवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार

६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येणार

२१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार

२३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार

सर्व प्रक्रिया आणि अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)