बालाघाटाच्या विकासाचे स्वप्न पुर्ण करणार- ना. पंकजाताई मुंडे

05-01-2017 : 02:06:52
     1187 Views

बालाघाटावर २२ कोटी विकासकामाचे भूमिपूजन
बीड /प्रतिनिधी
राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा जादा निधीच्या माध्यमातुन बालाघाटाच्या विकासाचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी बालाघाट विकास पर्व दौर्यात बीड भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, आ. संगिताताई ठोंबरे, आमदार आर.टी. देशमुख,,मा.आ.अदिनाथराव नवले पाटील,संतोष हंगे, नवनाथ शिरोळे,सलिम जहांगीर, स्वप्नील गलधर,राजेंद्र बागर,सुभाष धस,देविदास नागरगोजे,नाना महाराज कदम,गणेश पुजारी,प्रविण पवार आदीसह मान्यवर सहभागी झाले होते.
पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी बालाघाट विकास पर्व दौर्यात जेबापिंप्री- चांदेगाव येथे दिनदयाळ उपाध्याय ग्राम जोती योजने अंतर्गत ६ कोटी ७१ लक्ष रुपयांच्या ३३ के.व्ही. सबस्टेशन कामाचा शुभारंभ, मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ७ कोटी ५० लक्ष रुपयांचा शुभारंभ, जेबापिंप्री- सात्रा- अंधापुरी- तांदळवाडी घाट - सफेपुर १७ किलोमीटर हॉटमिक्स रास्ता कामाचा शुभारंभ, पर्यटन विकास योजने अंतर्गत पोथरा- मुर्शदपुर घाट येथे १ कोटी २० लक्ष रु.श्री क्षेत्र काशेश्वरी देवी मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ, जलयुक्त शिवार योजना व जिल्हा नियोजन निधी अंतर्गत १ कोटी २२ लक्ष रुपयांचा चांदेगाव येथे सिमेंट बंधारे व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ, जलयुक्त शिवार योजना व जिल्हा नियोजन निधी अंतर्गत ७१ लक्ष रुपयांचा अंबिलवडगाव येथील नदीवरील पुलाचे बांधकामाचा शुभारंभ, नेकनूर येथील कळसंबर रोडवर ३३ के.व्ही. सबस्टेशनचे भुमीपुजन, ग्रामविकास २५१५ योजने अंतर्गत नेकनूर येथे ४७ लक्ष रु. शादिखाना बांधकाम, सभामंडप कामाचे भुमीपुजन, अल्पसंख्याक विकास योजने अंतर्गत नेकनूर येथे सिमेंट रस्ते, सोलार पथदिवे कामाचे भुमीपुजन, ग्रामविकास २५१५ योजने अंतर्गत २४ लक्ष रु.चे सावरगाव घाट- अंधापुरी- तांदळवाडी घाट - सफेपुर- पोथारा - खंडाळा- आंबीलवडगाव येथे सोलार पथदिवे कामाचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी चाकरवाडी, चांदेगाव, पोथरा, मुर्शदपूर, नेकनूर येथे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पालकमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या, सत्तेच्या माध्यमातून बालाघाटाला मी नेहमीच झुकते माप दिले आहे. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा नियोजन, आमदार व खासदार निधी आदींच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा विकास निधी आणून प्रगतीपथावर नेण्याचा माझा प्रयत्न आहे. गावातील राजकीय पक्ष, जात, धर्म न पाहता प्रत्येक गाव आपलं समजून मी निधी दिला आहे. मुंडे साहेबांच्या पश्चात हा बालाघाट मला सुजलाम सुफलाम करून देशात व राज्यात मान उंचावेल असे काम करू असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, बालाघाटाच्या विकासासाठी ना.पंकजातार्इंनी जिल्हा परिषदेत सत्ता नसताना २२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आल्यावर बालाघाट सुजलाम सुफलाम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असेही स्पष्ट केले.
.यावेळी ना.पंकजाताईचे स्वागत सौ.सारिका पोकळे,दिपाली दुग्गड,स्वाती पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी केले कार्यक्रमास मोठया प्रमाणावर महीला,नागरीक उपस्थीत होते.बालाघाटावरील विकास पर्व दौरा यशस्वी करण्यासाठी नेकनूरचे सरपंच शेख अन्वर, दयानंद निर्मळ, बिभीषण शिंदे, नामदेव काळे, जितेंद्र शिंदे,अमित देशमुख, सुंदर पोकळे, शरद दुग्गड यांनी परिश्रम घेतेले. कार्यक्रमाला बालाघाटावरील ग्रामस्थांनी मोठ्या संखेने हजेरी लावली.
क्षणचित्रे
* बालाघाटावर ना.पकजाताईच्या विकासाचा झंझावात
* इतिहासत प्रथमच ग्रामीण भागात एवढया मोठया प्रमाणात निधी दिला.
* गावागावात लोकांची गर्दी ताईचा सत्कार करण्याची धडपड..
* नियाजीत वेळे पेक्षा चार चार तास कार्यक्रमांना उशिर होऊनही लोकांची तुफान गर्दी.
* रात्रीच्या थंडीतही लोक पंकजाताईना पाहण्यासाठी व एैकण्यासाठी उपस्थित.
* महीलाची लक्षणीय गर्दी.
* ना.पंकजाताईही भाराऊन गेल्या..
* रमेश पोकळे यांच्या नियोजनाचे पंकजाताई कडून आणि मान्यवरानकडून कौतूक.
* बालाघाटावर रमेश पोकळेनी खेचून आनलेल्या कामाचीच चर्चा.
comments