दबावाला बळी न पडता भाजपालाच मतदान करा- रमेश पोकळे

2016-11-26 22:30:12
     723 Views

* अफवांवर विश्वास ठेवू नका
* बीडच्या विकासासाठी भाजपाला निवडुन द्या
बीड / प्रतिनिधी
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे बीड शहराच्या विकासासाठी मतदारांनी सर्व प्रकारचा दबाव झुगारुन भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार सलिम जहांगीर आणि सर्व नगरसेवक पदाच्यासाठी उभ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावे. असे अवाहन भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी प्रसिध्दि पत्रकाव्दारे केले.
बीड नगरपालिकेची निवडणुक ना. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जात आहे. बीड शहरातील रस्ते, वीज, पाणी आणि मुलभूत प्रश्न भारतीय जनता पक्षच सोडवू शकतो. हे बीडच्या सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आल्याने सर्व नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच विजय संपादन करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षात सर्व सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासनिधी बीड नगरपालिकेला मिळण्यासाठी भाजपला सत्ता द्या. नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांचे म्हणजेचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे भ्रष्टाचारातील भागीदारीचे राजकारण आहे. त्यांच्या आर्थिक राजकीय साठेलोटे आहे. भाजपचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत. याउलट इतर पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहेत अशा उमेदवारांना मतदान करु नका.
सत्ताधार्‍यांनी सत्तेच्या माध्यमातून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता, हे सूत्र गेली ३० वर्षे अवलंबले आहे. अलीकडच्या काही वर्षात तेवढ्यावरच न थांबता, दहशत, वाममार्गाचा अवलंब करून शहरातील जनतेला वेठीस धरण्याचा कार्यक्रम अवलंबिला आहे़ ही विचित्र संस्कृती मुळापासून नष्ट करण्यासाठी शहरातील मतदार यावेळी नक्कीच परिवर्तन घडवतील यात शंका नाही, असेही रमेश पोकळे यांनी नमुद केले.
नगरपालिका निवडणुकीत भाजपने बीड शहराचा सर्वांगीण विकास, या मुद्यावर निवडणूक लढवली आहे. अवघ्या दोन वर्षांत भाजपच्या सत्तेच्या काळात हजारो कोटींची विकासकामे ना. पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात केलेली आहेत. ही विकासकामे केवळ ट्रेलर आहे. शहरात आणखी मोठी विकासकामे करायची आहेत. भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला मतदार साथ देतील. त्यामुळे नगरपालिकेवर भाजपचीच एकहाती सत्ता येईल असा विश्वास रमेश पोकळी यांनी व्यक्त केला.
मतदाना दिवशी जर कोणी अफवा पसरवीत असेल, मतदानासाठी अमिश दाखवले जात असतील तर जनतेन अफवांवर विश्वास न ठेवता आणि कोणत्याही अमिशाला बळी न पडत मतदानात सहभागी होऊन भाजप उमेदवारांना मतदान करावे. असे अवाहन रमेश पोकळे यांनी केले.
comments