जनतेच्या मनातील असंतोष मतपेटीतूनच व्यक्त होणार भाजपा महायुतीचाच झेंडा बीड नगरपलिकेवर फडकणार- खा.दानवे

2016-11-23 17:02:11
     883 Views

बीड
जाती जाती मध्ये भांडणे लावायचे आणि आपले भले करुन घ्यायचे ही राष्ट्रवादी अणि कॉग्रेसवासल्यांची चाल आता जनतेच्या चांगलीच लक्षता आली आहे. दलित आणि मुस्लीमांच्या मतावर निवडुन यायचे आणि त्यांना आयुष्यभर वेठीस धरायचे हे आता दलित मुस्लीमांच्या लक्षता आले आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील असंतोष येत्या २७ तारखेला मत पेटीतून व्यक्त केल्यावर बीड नगर परिषदेवर भाजपा आणि महायुतीचा झेंडा फडणार आणि शेख सलिम जहाूॅगिर या नगरीचा नराध्यक्ष होणार यात कुठलीच शंका नाही असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा.रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.
बीड नगर पालिकेतील भारतीय जनता पार्टी, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सावता परिषद, शिवा संघटना महायुतीचे बीड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलिम जहाँगिर आणि महायुतीचे सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ सिध्दीविनायक परिसरात घेण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज राज्यात भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडुन येणार असे चित्र सर्वत्र दिसुन येत आहे. मोदी आणि फडणवीस सरकारवर जतनेचा विश्वास आहे. देशहिताचे आणि जनहिताचे कामे केली जात आहेत त्यामुळे जनता समाधानी आहे. जर नगर पलिकेची सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली तर निश्चीत शहराच्या विकासाला भरीव निधी मिळेल आणि शहराचा विकास होईल असा विश्वास जनतेच्या मनात आहे त्यामुळे सर्वत्र भाजपाचेच उमदेवार निवडुन येणार असे चित्र राज्यात दिसुन येत आहे. बीड शहरात भाजपाने महायुतीने मुस्लीम समाजातील स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून सलिम जहाँगिरच्या रुपाने दिला आहे. मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली म्हणून अनेकजणांच्या पोटात दुखु लागले आहे इरवी मुस्लीम तुमच्याकडे असला की चांगला की आमच्याकडे आला कि वाईट असा प्रचार पोट दुखणारे करु लागले आहेत. मोदी सरकार आल्यानंतर मुस्लीमांच्या सवलती काढुन घेतल्या जातील अशी भिती मुस्लीम समाजामध्ये निर्माण करण्यात आली . मात्र मोदी सरकार आल्यानंतर सवलती काढुन घेण्याऐवजी सवलती वाढण्यात आल्या. त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये समाधाना व्यक्त होत आहे. दलित आणि मुस्लीमांना वेठीस धरण्याचे काम या कॉग्रेस सरकार ने केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदु मिलची जागा लंडन मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे घर या शासनाने ताब्यात घेतले आहे. दलित समाजातही त्यामुळे अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉग्रेसवाल्यांच्या काळामध्ये लाईन रेषणसाठी, रॉकेलसाठी, खातासाठी लागायची. शेतक-यावर गोळीबार व्हायचा तेव्हा मात्र या सरकारला सर्वसमान्य लोकांचा कळवळा येत नव्हता आज मात्र बँकेच्या समोर लाईन लागण्याची बोबाबोंब हे करत आहेत ती केवळ त्यांच्या स्वार्थासाठीच. बीड नगर पलिकेची सत्ता मतदारांनी जर भाजपाच्या ताब्यात दिली तर सर्वात जास्त निधी या बीड नगर पलिकेला दिली जाईल असा शब्द मी देतो असे खा.रावसाहेब दानवे पाटील म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे ,अ‍ॅड.सर्जेराव तांदळे, कल्याण आखाडे यांची भाषणे झाली तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलिम जहाँगिर यांनी केले. कार्यक्रमास आ.आर.टी.देशमुख, सतिष पत्की, भागवत कराड, मा.आ.आदिनाथराव नवले पाटील, राजेंद्र बांगर, नवनाथ शिराळे, चंद्रकांत फड, अजय सवाई सुभाष धस, स्वप्नील गलधर, शिवाजीराव फड, स्वप्नील गलधर, अनिल चांदणे, संदिप उबाळै, जगदिश गुरखुदे, राजु जोगदंड, इर्शाद भाई, आदित्य सारडा, राहुल बनगर, श्रीनिवास भोसले, सुधिर घुमरे, डॉ.वनवे, सगिता धसे, शैलाताई मुसळे, महेश बुध्ददेव, डॉ.लक्ष्मण जाधव, प्रविण पवार भुषण पवार, भागवत सानप, उज्वल कोटेचा यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नवनाथ काशिद यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.देविदास नागरगोजे यांनी केले.
comments