न्यु व्हिजनमध्ये कौशल्य विकासचे मोफत प्रशिक्षण

2016-11-21 11:00:32
     734 Views

बीड/प्रतिनिधी
प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास समिती मान्यता प्राप्त कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था संचलीत न्यु व्हिजन स्कील डेव्हलपमेंट सेंटर, माने कॉम्प्लेक्स, बीड येथे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छूक विद्यार्थी, सुशिक्षीत बेरोजगार तरुण- तरुणींनी गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०१६ पर्यत नाव नोंदणी करावी असे अवाहन प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार यांनी केले आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात आरोग्य सहाय्यक, डिजिटल फोटोग्राफी, शुटींग कॅमेरा, जनसंवाद आणि मनोरंजन, ऑडीओ रेकॉर्डींग, हेल्त केअर नसिंग आणि अकाऊंट असिस्टंट टॅली हे चार महिन्याच्या कोर्सच्या माध्यमातुन कौशल्य विकास केला जाणार आहे. तसेच या विविध विषयांवर प्रात्याक्षिक थेअरी व भेटी द्वारे विशेष तज्ञ, व शासकीय पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. हे कोर्स पुर्ण करणा-या महिला, पुरुषांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

सदर कौशल्य विकास कार्यक्रमात ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षीत बेरोजगार, महिला व पुरुषांना तसेच अनुसूचित जाती जमाती, एन.टी, ओबीसी, अपंग, बीपीएल धारक उमेदवारांना निशुल्क प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर कोर्ससाठी इय्यता अठवी ते बारावी पास असणारे प्रवेश घेवू शकतात. प्रेवशासाठी शाळा सोडल्याचा दाखला, मार्क सिट, आधारकार्ड, रेशनकार्ड, फोटो जातीचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति आवश्यक आहेत.
ज्या महिला आणि पुरुषांना या कौशल्य विकास प्रशिक्षण घ्यावयाचे आहे अशा उमेदवारांनी आपली नांव नोंदणी न्यु व्हिजन स्कील डेव्हलपमेंट सेंटर, माने कॉम्प्लेक्स, विद्यानगर, नाट्यगृह रोड बीड येथे लवकरात लवकर करावी. असे अवाहन प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार यांनी केले आहे.
comments