बीड जिल्ह्यातील नगरपरिषदा भाजप पूर्ण ताकदीने लढवणार - रमेश पोकळे

2016-10-20 17:49:00
     1734 Views

शुक्रवार, शनिवार जिल्हाभर बैठकांचे आयोजन

नगरपालिकेसाठी इच्छूकांच्या मुलाखाती घेणार

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकात भाजप स्वच्छच प्रतिमेचे उमेदवार देवून पूर्ण ताकतीने पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि आणि खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठीशी जनमताची ताकद वाढली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ग्राम विकासाचा घेतलेला ध्यास पूर्णत्वाकडे जात आहे. जिल्ह्यातील नगर पंचायती आणि ग्राम पंचायतींना मोठ्या प्रमाणावर निधी देऊन त्यांना विकासाच्या बाबतीत परिपूर्ण केले जात आहे . केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून आता बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, बीड, परळी, धारुर, अंबाजोगाई नगर पालिकेवरही भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. त्यामुळेच भाजपने ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे रमेश पोकळे यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणुकीत सहा नगरपालिकामध्ये भाजपची रणनिती ठरवीण्यासाठी भाजप पदाधिकारी जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, बीड, परळी, धारुर, अंबाजोगाई येथे दोन दिवस दौरा करणार आहे. या दौर्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक आणि नगरसेवक पदासाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.भाजप पदाधिकारी शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता गवराई येथे बैठक, दुपारी ०१.३० बीड येथे अनविता हॉटेलमध्ये बैठक, तर सायंकाळी ०५.०० अंबाजोगाई येथे बैठक होणार आहेत. तर शनिवार दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता धारुर येथे बैठक, दुपारी ०२.०० वाजता माजलगाव आणि सायंकाळी ०५.०० वाजता परळी येथे बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व नगरपालिकामध्ये इच्छूक असलेल्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठीच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती भाजप मराठवाडा विभागाचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, आमदार आर.टी. देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, आमदार संगीताताई ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
तरी इच्छूक उमेदवारांनी, पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले आहे.
comments