प्रास्ताविक. खा.डॉ.प्रीतम मुंडे:-

2016-06-04 8:49:37
     3119 Views

प्रास्ताविक. खा.डॉ.प्रीतम मुंडे:-
मुंडे साहेबांच्या सत्काराची तयारी करीत असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. मुंडे साहेबांच स्वप्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करित आहोत. जिल्हयात विकास कामांचा वर्षाव सुरू आहे. मला भावना अनावर होत आहेत.
■सुजीतसिंह ठाकुर:- राज्यात मुंडे साहेबां सारखा दुसरा नेता होणे नाही. ज्या नेत्याने मला मोठ केल तो मी आमदार होत असताना नसल्याचे दु:ख होत आहे.
■ डॉ. तात्याराव लहाने :- साहेब माझ्याकडे जे पेशंट पाठवायचे त्यांच्या बाबतीत ते घरातील असल्याचे सांगायचे. माणसाची अडचण पहायचे. माझ्या कीडणीचे ऑपरेशन करताना ते सोबत असायचे. मुंडे साहेबांच्या पश्चात ताईंच्या मागे उभे रहा
■ सदाभाउ खोत:- उसतोड मजुर, उसउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण त्यांना होती. मुंडे साहेबांना स्वतंत्र भुमीका होती. चळवळीत काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम करायचे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला ते पाठींबा दयायचे. आम्ही पंकजाताईंच्या कायम सोबत राहणार आहोत.
■महादेव जानकर :- केंद्रात व राज्यात असलेल सरकार हे,मुंडे साहेबांच आहे. मुंडे साहेबांच्या अदयाप पर्यंत काही स्वप्न अपुर्ण आहेत. आम्ही कायम पंकजा मुंडे सोबत राहणार आहेत.
■खा.अमर साबळे:- मला राजकीय संस्कार व समाजाप्रती समर्पीत पणा मुंडे साहेबांनी शिकविला. त्यामुळेच मी राज्यसभेत खासदार म्हणुन काम करीत आहे. मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल.
■ राम शींदे:- ज्या लोकांसाठी काम केल त्या लोकांध्ये कायम मुंडे साहेबांची आठवण निघते. मुंडे साहेबांच्या तोडीस तोड पंकजा मुंडे काम करित आहेत. पंकजा मुंडे यांची जलयुक्त शिवार योजना देशभर गाजत आहे. त्यांच्या आठवनींना उजाळा देत आपल्याला पुढे जावे लागले. पंकजा मुंडे मुळे लोकांना दिलासा मिळत आहे.
■बबनराव लोणीकर :- गरजु व गरीबांना मदत करण्याचे काम पंकजा मुंडे करित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे चे स्वागत केले. हा आपला सन्मान आहे. महाराष्ट्रामध्ये गोपीनीथ मुंडे यांच्या मुळेच विविध पक्ष एकत्र आलोत. आम्ही सत्तेत केवळ मुंडे साहेबांमुळेच आहे. गोदावरीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी गोदा परिक्रमा काढली. मुंडे साहेब म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना होता. ज्यांच हात धरल तो आमदार खासदार झाला. विकासाची गंगा गावा-गावा पर्यंत न्यायची मुंडे साहेबांची ईच्छा होती.
■ रावसाहेब दानवे :- देशात भाजप चे सरकार आले. त्या सरकारमध्ये माझा समावेश केला होता. मोदींच्या घरी मंत्रीमंडळाची बैठक होती. त्यानंतर आमची चर्चा केली. ग्रामविकास खात्याकडुन जेवढी मदत राज्यासाठी नेता येईल. सकाळी अपघात झाला होता. त्या अपघातात ते गेले होते. मुंडे साहेब कायम चर्चेच राहतात. त्यांचा व माझा ३५ वर्षाचा सहवास होता. मुंडे साहेब आमदार झाले तेव्हा मीही आमदार झालो होतो. मुंडे व मी एकत्र काम केले आहे. त्यांचे राजकीय संस्कार माझ्यावर आहेत. सुरूवातीला आमची फार अडचण असायची. मुंडे साहेबांनी संघर्षयात्रा काढली. राज्यात सत्ता परिवर्तन झाले. मुंडे साहेबांना जनतेचे बळ मोठया प्रमाणात होते. पंकजाच्या रूपाने आम्ही मुंडे साहेबांना पाहतोत.
comments