१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक

2016-04-21 19:14:59
     2857 Views


बीड, दि. २१ :- विना हेल्मेट वाहन चालवितांना अपघातामध्ये लोकांना गंभीर ईजा/दुखापती होतात. काही वेळा त्यांना आपले प्राण ही गमवावे लागतात. हेल्मेटचे महत्व जाणून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व दुचाकीस्वार नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा. दि.१ मे २०१६ पासून विना हेल्मेट दुचाकीस्वाराविरुध्द कलम १२९/१७७ मोटार वाहन कायद्याप्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. असे पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी कळविले आहे.




comments