दूरदर्शनमधील करिअर संधी


दूरदर्शनमधील करिअर संधी

दूरदर्शनची रचना बघितली असता त्यात सर्वात प्रमुख जो असतो तो प्रसारभरतीचा अध्यक्ष. त्यांनतर व्हाइस प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंट खालोखाल जनरल मॅनेजर अशा प्रकारची वरच्या फळीतील मंडळी असतात. त्यानंतर मग अभियांत्रिकी आणि इतर कार्यक्रम याप्रमाणे त्याची विभागणी होते. अभियांत्रिकीमध्ये चीफ इंजिनीअर्सचा समावेश होतो. याखेरीज विक्री व्यवस्थापक हा एक वेगळा असतो. आणि याला सोडून दूरदर्शनच्या कार्यक्रमानुसार तीन मोठे भाग पडतात. त्यापैकी एक कार्यक्रम निर्देशक( प्रोग्रॅम डायरेक्टर), न्यूज अँड पब्लिक अफेअर्स आणि त्यानंतर पब्लिक इन्फोर्मेशन असे तीन वेगवेगळे भाग पडतात. त्यामध्ये पुन्हा आपल्याला मुळात विचार करायचा आहे तो म्हणजे कार्यक्रम संबंधित रचनेचा. मुख्य कार्यक्रम निर्देशकाच्या हाताखाली कार्यक्रम निर्माता म्हणजेच प्रोड़यूसर्स आणि ग्राफिक मल्टिमीडिया असे दोन भाग पडतात. यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार निर्देशक नेमलेले असतात. यात प्रोग्रॅम किंवा कार्यक्रमांविषयीच्या माहितीचा आढावा आपण घेऊयात :
सध्या बातमीच्या संदर्भात कुठे कुठे संधी असू शकतात याबद्दल :
न्यूज अँड पब्लिक अफेअर्स याअंतर्गत वेगवेगळे कार्यकरी निर्माता नेमलेले असतात. या कार्यकारी निर्मात्यांचं कार्य काय ते पाहूयात :
कार्यकारी निर्माता : दूरदर्शनच्या बातम्यांच्या निर्मितीकरिता या कार्यकारी निर्मात्यांची गरज असते. हे कार्यकारी निर्माता एकूण बातमीचे स्वरूप कसे असावे, बातमीपत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जावा, बातमीपत्रामध्ये लागणारे व्हिज्युअल्स कुठून गोळा करावेत. बातमीपत्राशी संबंधित जी काही आचारसंहिता आहे त्याची अंमलबजावणी कशी करावी या सगळ्यांशी संबंधित कार्य बघत असतात. हे करत असताना त्यांना वेगवेगळ्या अशा साहाय्यकांशी नेमणूक आणि त्यांच्यासोबत एक सांघिक कार्य पार पाडावे लागते. त्यासाठी बातमी विभागामध्ये वेगळ्या अशा स्टाफची नेमणूक केलेली असते. यात बातमीपत्र तयार करत असतानाचा न्यूज स्टाफ, वेगवेगळे लहान-मोठे निर्माते, वेगवेगळे बातमीदार, निवेदक आणि छायाचित्रकार यांचा यामध्ये समावेश होतो. याखेरीज काही जण स्ट्रीन्जर म्हणून ओळखले जातात की जे मुक्त पत्रकार असतात आणि त्यांच्याकडूनदेखील कार्यकारी निर्मात्यांना काम करून घ्यावे लागते. यापैकी एकेकाची भूमिका आता आपण पाहू :
कार्यक्रम निर्माता किंवा निर्देशक : दूरदर्शनच्या मुख्य कार्यकारी निर्मात्याच्या हाताखाली कार्यक्रम निहाय निर्मात्यांची नेमणूक केलेली असते. हा कार्यक्रम निर्माता एखाद्या कार्यक्रमाला पूर्णत: जबाबदार असतो. म्हणजेच एखाद्या बातमीपत्राला जबाबदार असणारा निर्माता असू शकेल किंवा बातमीवर आधारित जे समसामायिक कार्यक्रम येतात त्यासाठीदेखील अशा निर्मात्यांची गरज भासत असते. हे निर्माता त्या कार्यक्रमाच्या निर्मितीशी संबंधित खर्च, त्या कार्यक्रमाचे संकल्पित, बजेट, कार्यक्रमाचा सेट, कार्यक्रमासाठी लागणारे इतर खर्च या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेत असतात. या निर्मात्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य मुख्य कार्यकारी निर्माता करत असतो, मात्र स्वत: या निर्मात्यांनासुद्धा त्या त्या कार्यक्रमाविषयीची सगळी जबाबदारी त्याच्यावर असते. यानंतर येतात ते वार्ताहर.
वार्ताहर : दूरदर्शनच्या वेगवेगळ्या बातमीपत्रांमध्ये या रिपोर्टर्सचा किंवा बातमीदाराचा प्रामुख्यानं समावेश असतो. वेगवेगळ्या शहरांमधून, वेगवेगळ्या राज्याच्या राजधानीच्या मधून आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे बातमीदार प्रत्यक्ष जाऊन बातमी संकलनाचे कार्य करतात. हे करताना त्यांना सुरुवातीला स्वत:चा कॅमेरा असावा असे बंधन होते आणि मुक्त पत्रकारांचाच यामध्ये समावेश होत होता, मात्र आता दूरदर्शनचे स्वत:ची टीम किंवा त्यांची स्वत:ची ओबी व्हॅन बातमीदारांच्या मदतीसाठी असते. अर्थात मुख्य बातमीदारांसाठीच ही सोय केली जाते. यानंतर असतात ते निवेदक
निवेदक : दूरचित्रवाणीवरील वेगवेगळ्या बातम्यांचा किंवा समसामायिक विषयावर चर्चा करणा-या आणि प्रामुख्यानं ज्यांना लोक ओळखतात असा चेहरा असतो तो निवेदकाचा. बातम्या देणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे इत्यादी कार्य निवेदकाला करावे लागते. यासाठी दूरदर्शनकडून वेगळी ऑडिशन घेतली जाते. त्या ऑडिशनमध्ये पास होणा-यालाच निवेदनाची संधी दिली जाते. निवेदकाच्या मदतीला टेली प्रॉम्पटर असला तरी त्यांना आधीच बातम्या किंवा लीड स्टोरीज या वाचण्यासाठी दिल्या जातात कीजेणेकरून त्यांचे उच्चार हे स्पष्ट असावेत किंवा त्या संदर्भात त्यांना कोणतीही शंका असल्यास त्यांना थेट निर्मात्याला ते विचारता यावेत. यासाठी ही योजना केलेली असते. या निवेदकाचे ज्ञान आणि वाचन हा यातील एक आवश्यक घटक आहे. यानंतर असतात ते छायाचित्रकार.
छायाचित्रकार : हे दूरचित्रवाणीच्या बातमीदारासोबत बातमी संकलनासाठी जाऊन छायाचित्रे गोळा करण्याचे कार्य करतात तर काही वेळा व्हिज्युअल्स आणतात. आणि नंतर वृत्तसंस्थांकडून आलेली काही छायाचित्रे किंवा व्हिज्युअल्स बातमीसोबत घेतले जातात. काही वेळा बातमीदाराला पीटूसी म्हणजेच पीस टू कॅमेरा द्यायचा असतो. त्यावेळी त्यांच्यासोबत छायाचित्रकार असणे आवश्यक आहे. दूरचित्रवाणीचा छायाचित्रकार होण्यासाठी प्रसारभारती महामंडळाकडून वेगळी परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेत पात्र ठरलेल्यांच छायाचित्रकार म्हणून नेमले जाते. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे स्ट्रीन्जर किंवा मुक्त पत्रकार.
मुक्त पत्रकार : तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्यके शहरात स्वत:चा वार्ताहर नेमणे शक्य नाही. ते अत्यंत खर्चिक पडेल म्हणून स्ट्रीन्जर्सची नेमणूक केली जाते. या स्ट्रीन्जरने एखादी बातमी दूरदर्शनच्या बातमीपत्रामध्ये बातमीप्रमाणे त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन ती बातमी किती सेकंद दाखवली आहे यानुसार देखील मानधन असते. तसेच स्ट्रीन्जरकडून आलेली प्रत्येक बातमी दाखवली जाणारच अशी कोणतीही हमी दिली जात नाही.
पीटीसी : पार्ट टाइम करस्पॉडेंट असा एक शेवटचा भाग दूरदर्शनसाठीचा असतो. काही लोकांना अर्धवेळ म्हणून दूरदर्शनवरून नेमणूक दिली जाते आणि त्यांना दूरदर्शनच्या मूळ वेतनावर न ठेवता फक्त भत्ते खर्च दिला जातो आणि त्यांच्याकडून कार्य करून घेतले जाते. वेगवेगळ्या मोठ़या महानगरांमध्ये अशा प्रकारचे पार्ट टाइम करस्पॉडेंट किंवा अर्धवेळ वार्ताहर आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे दूरदर्शनच्या बातमी विभागाची रचना असते आणि यामध्ये खूप मोठ़या प्रमाणावर करिअरच्या संधी आहेत.
पुढच्या सदरामध्ये आपण प्रसारभारती महामंडळाची रचना आणि त्यांच्याकडून निघणा-या नोकरीच्या जागा यासंदर्भात आढावा घेऊ.
१२ वी पास विद्याथ्र्यांसाठी बी.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता तर पदवी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. संपर्क - वसंतराव काळे पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालय, बीड, ९५५२५५६३९७ ९५२७८१५१५१ ७४२०९०४०५५
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)