विवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारकडून चंद्रभागा नदी व वाळवंटाची पाहणी

2016-05-05 8:53:13
     241 Views

पंढरपूर : नमामी चंद्रभागा या योजनेंतर्गत चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. चंद्रभागा नदी शुद्धीकरणासाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या निमित्ताने आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रभागा नदी व वाळवंटाची पाहणी करुन चंद्रभागा नदी शुद्धीकरणाच्या आराखड्याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेतली. तसेच चंद्रभागा नदीवर बांधण्यात येणाऱ्या घाट बांधण्याच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली.

यावेळी वित्तमंत्र्यांसमवेत पालकमंत्री विजय देशमुख, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, सर्वश्री आमदार प्रशांत परिचारक, भारत भालके, संजय धोटे, दत्तात्रय सावंत, जिल्हाधिकारी रणजित कुमार, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार नागेश पाटील, मुख्याधिकारी शंकर गोरे, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे आदी उपस्थित होते.
comments