‘दिल दोस्ती दुनियादारी’


अगदी कमी वेळात महाराष्ट्रातील घराघरांतील लोकांच्या मनात घर करून बसलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही प्रसिद्ध मालिका आता अल्पविराम घेत आहे. मात्र, लवकरच या मालिकेचा दुसरा सीझन येणार आहे. त्याविषयी मालिकेचे निर्माते संजय जाधव म्हणाले, आम्ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका सीझन्समध्येच करायचे ठरवले होते. आता मालिकेला एक वर्ष पूर्ण होतेय त्यानिमित्ताने याच्या पहिल्या सीझनची आम्ही समाप्ती करतोय. ‘दिल दोस्ती...’ सुरू करतेवेळीच आम्ही ही मालिका सीझन्समध्ये करायचे ठरवले होते.

जेणेकरून १० वर्षांनंतरही लोकांनी मालिकेचा पहिला सीझन तितक्याच आवडीने पाहावा हा त्यामागचा हेतू आहे. दुस-या सीझनमधील कलाकारांविषयी बोलाल तर मला नाही वाटत की या सहाजणांची जागा दुसरं कोणी घेऊ शकतं. या मालिकेतील कलाकारांची निवड करण्यासाठी आम्ही तब्बल सहा महिने घालवले होते.

आता या मालिकेला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहता त्या सहा महिन्यांचे चीज झाल्याचे दिसते. जर सर्व प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळत राहिले तर नक्कीच मला या मालिकेवर चित्रपट काढायला आवडेल. या मालिकेमुळे मला आणि या मालिकेतील सर्वच मुलांना प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असेच प्रेम तुम्ही आमच्या पुढच्या सीझनवरही कराल, अशी आम्ही अपेक्षा करतो.




comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)