महिलांनी साडीच घालावी - विद्या बालन

2016-02-26 12:43:29
     283 Views

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन कुठल्याही कार्यक्रमात साडीच नेसते. त्यामुळे तिचे साडीवरील प्रेम सर्वांना माहिती आहे. विद्या बालन केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाहीतर आंतराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसण्यास प्राधान्य देते. भारतातील स्त्रियांनीही साडीला विशेष प्राधान्य द्यावे, असे मत विद्या बालनचे आहे.
विद्या बालनने नुकतेचं ‘वाया’ या साडीच्या कलेक्शनचे अनावरण केले. मुंबईतील कुमारास्वामी हॉल येथे या साड्‌यांचे प्रदर्शन सुरू आहे. ‘वाया’ हा ब्रॅण्ड गौरांग शाह, बाप्पादित्य आणि मीरा सागर या डिझाइनर्संनी सुरू केला आहे. आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि पारंपारिकता या दोन गोष्टीची योग्य जोडणी करून तयार करण्यात आलेल्या या साड्‌यांची विद्याने प्रशंसा केली. यावेळी ती म्हणाली, ‘वाया’ ब्रँण्डअंतर्गत तयार केलेल्या साड्‌या महिलांना साडी नेसण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या आहेत. कोणत्याही वयोगटातील महिलांवर या साड्‌या खुलून दिसतील, अशा या साड्‌या डिझाइन करण्यात आल्या आहेत. जेणेकरून महिला केवळ ठराविक कार्यक्रमाला साडी न नेसता इतरवेळीही साडीला प्राधान्य देतील.
comments