सनीचा यघायल वन्स अगेन’ जरूर बघेन !

26-02-2016 : 12:43:04
     535 Views

सत्ताधारी, उद्योगपती, पोलीस, डॉक्टर यांची अभद्र युती आपले मनसुबे तडीस नेण्यासाठी संपूर्ण राज्यव्यवस्थाच भ्रष्ट आचाराने पोखरुन टाकत सर्वसामान्य माणसांना कशी वेठीस धरते, याचे मासलेवाईक उदाहरण सादर करीत यघायल वन्स अगेन’ हा सिक्वेल अपेक्षेप्रमाणे शेवटाला दिलासादायक यसत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य अधोरेखित करतो. ६ीेि-सहरूरश्रया चित्रपटात साहसदृश्ये आणि मारधाडीवर भर देण्यात आल्याने कथानक प्रभावीपणे फुलू शकलेले नसले तरी थरारकता पुरेशा परिणामकारकरित्या निर्माण होत असल्याने चित्रपट अखेरपर्यंत खिळवून ठेवतो, निश्चितच.

यघायल वन्स अगेन’ हा १९९० मध्ये येऊन गेलेल्या सुपरहिट यघायल’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या सिक्वेलचे लेखन-दिग्दर्शन हे अभिनेता सनी देवलने केले आहे. पटकथा प्रिक्वेलशी मिळतेजुळती ठेवत विद्यमान कालखंडाशी सुसंगत राखण्याचे भानही त्याने ठेवले आहे. त्यामुळेच मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक, क्लोज सर्किट कॅमेरे यातून कथानक फिरत राहते. कधीकधी हॅकिंगच्या यफंक्शन’ वरही स्थिरावते. लेखनाच्या पातळीवर खूपच मेहनत घेण्यात आल्याचे यावरुन दिसून येते. कोणतीही तांत्रिक चूक किंवा तर्कशुध्दता यांची उणिव राहू न देण्याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आल्याने सिनेमा विद्यमान कालखंडाशी जवळिक साधत राहते. प्रसंगांना फ्लॅशबॅकद्वारे प्रिक्वेलमधील घटनांशी जोडण्यात आले आहे.

तथापि, सादरीकरण मात्र काही प्रसंगांमध्ये नव्वदच्या दशकातील पारंपरिक साच्यातून निघाल्यासारखे दिसते. विशेषतः भावुक प्रसंगातील संवाद आणि शब्दफेक नव्वदमधील सिनेमा पाहत असल्याचा फिल निर्माण करतात. मेलोड्रमॅटिकपणा सध्याच्या कालखंडाच्या तुलनेत अतिच वाटतो. पूर्वार्ध इतका प्रभावी झाला आहे की त्यामुळे चित्रपटाकडून मोठय़ा अपेक्षा निर्माण हेतात. परंतु उत्तरार्थ मात्र काही प्रमाणात पूर्वार्धापेक्षा फिका वाटतो. तरीही उत्कंठा आणि थरारकता यामुळे चित्त खिळून राहते. प्रिक्वेलप्रमाणेच या सिक्वेलमध्येही अर्थातच अजय मेहरा या व्यक्तीरेखेभोवती कथानक फिरते ठेवण्यात आले आहे. अजय हा त्याच्या सेवाभावी वृत्तीमुळे जनतेच्या गळ्यातील ताईत झालेला असतो. यसत्यकाम’ या वृत्तपत्राद्वारे तो जनतेचा आवाज उठवत असतो. रंजल्या-गांजलेल्यांच्या, पीडितांच्या मदतीला धावून जात असतो. अशातच दुष्प्रवृत्तींच्या अनाचाराला सुरुंग लावणार्या माजी पोलीस अधिकार्यावर गोळ्या झाडून त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासविण्यासाठी आणखी काही निरपराधांची हत्या करण्याचे षडयंत्र घडते. याची फित काही तरुणांना मिळते. ही फित सोशल साईटस्वरुन लिक होऊ नये म्हणून दुष्प्रवृत्तीचे लोक या तरुणांवर प्राणघातक हल्ले करतात. या तरुणांची अजय सुटका करतो का? दुष्प्रवृत्तींना अद्दल घडते का? याबाबत उत्सुकता निर्माण करीत कथानक पुढे सरकत जाते. शेवट अपेक्षेप्रमाणे होंत असला तरी मोटारी, हेलिकॉप्टर आणि अगदी लोकलगाडय़ांमधील पाठलागाची साहसदृश्ये चित्तवेधक असल्याने मन प्रसंगांमध्ये खिळून राहते. प्रसंगातील परिणामकारकता थक्क करते. या चित्रपटात चार तरुण व्यक्तीरेखा समाविष्ट करुन आणि विद्यमान कालखंडातील उपकरणांना अंतर्भूत करुन युवा पिढीला जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही तरुणांना आकर्षित करु शकणार्या दमदार गीत-संगीताचा अभाव मात्र प्रकर्षाने जाणवतो. सनी नेहमीसारखाच जोशात आहे. अन्य सर्व कलावतांची कामे दमदारपणे वठली आहेत.

एकूणच, केवळ साहसदृश्ये आणि थरार यांची अनुभूती घेण्यात स्वारस्य असेल तर यघायल वन्स अगेन’ किमान एकदा बघेन, असा निर्धार करायला हरकत नाही. सनी देवलचा सच्चा फॅन मात्र नक्कीच म्हणेन- यघायल वन्स अगेन’ जरूर बघेन.
comments