सोनाली कुलकर्णी बनली पोश्टर गर्ल

12-02-2016 : 03:11:05
     499 Views

सिनेमा म्हटला की तयारी आलीचः दिग्दर्शकापासून ते लेखकापर्यंतः निर्मात्यांपासून ते टेक्नीशिअन्सपर्यंत सगळेच आपले काम उत्तम व्हावे यासाठी धडपडत असतातःतर आपली भूमिका उत्तम पार पडावी यासाठी कलाकारही खास कष्ट करताना आपल्याला दिसतात. १२ फेब्रुवारीला येऊ घातलेल्या वायकॉम१८ मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांच्या ‘पोश्टर गर्ल’ सिनेमासाठी सोनालीनेही बरीच मेहनत घेतली आहे.

‘हात खाली, नजर खालीः फक्त नाव लक्षात ठेवायचंः रुपाली’ ’ , म्हणत अख्या गावाला इंगा दाखवणारी ही ‘रुपाली थोरात’ , आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजाने गावातल्या पुरुषांच्या नाकी-नऊ आणतेः ‘पोश्टर गर्ल’ मधल्या रुपालीच्या भूमिकेविषयी बोलताना सोनाली म्हणते की, या भूमिकेसाठी तिने आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवला. ज्या पद्धतीने त्यांनी एका छोटय़ा शहरातून आपली कारकीर्द सुरू करून आज एक उंची गाठली आहे, तशीच काही स्वप्न रुपालीचीही आहेत. एका छोटय़ा शहरातून आलेल्या रुपालीला खूप मोठे व्हायचे आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तिच्यात आहे. शिवाय आयपीएस पाटील एका उंचीवर असूनही ते ज्या पद्धतीने आपल्या मातीशी जोडलेले आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही सोनाली म्हणाली. सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, हृषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिद्धार्थ मेनन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. समाजातल्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱया या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. एका विलक्षण गावाची कथा मांडणाऱया या चित्रपटाचं संगीत अमित राज यांचे आहे.

‘मराठी चित्रपटांचे प्रकाशक आणि वितरक यांच्या उत्कृष्ट समर्थनामुळे मराठी चित्रपट मोठमोठी शिखरे सर करण्यात यशस्वी होत आहेत. मराठी चित्रपट चाहत्यांनी नेहमीच चांगल्या विषयांना प्राधान्य दिले आहे. अशाच एका वेगळय़ा विषयावर बेतलेला ‘पोश्टर गर्ल’ आम्ही घेऊन येत असल्याचे वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचे सीओओ, अजित अंधारे यांनी म्हटले आहे. लेखक हेमंत ढोमे यांनी लिहिलेली पोश्टर गर्ल मनोरंजनाबरोबरच सामाजिक समस्यांवर जरूर प्रकाश टाकेल असं म्हणत, या चित्रपटासाठी वायकॉम१८ अत्यंत उत्साही असल्याचे ते म्हणाले. ‘मनोरंजन विश्वात एका वेगळय़ा उंचीवर असणाऱया वायकॉम१८ मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांच्याबरोबर मी माझा दुसरा चित्रपट ‘पोश्टर गर्ल’ करत असल्याचा आनंद व्यक्त करत जबाबदारी वाढल्याचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी म्हटले आहे.
comments