नटसम्राट’ ची कोटी कोटीची उड्डाणे

09-02-2016 : 07:48:23
     484 Views

मुंबई- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या चित्रपटातील दमदार अभिनय करणारा अभिनेता नाना पाटेकर यांच्या ‘कुणी घर देता का घर..’ या संवादाने प्रेक्षकांना भूरळ घातली. अवघ्या चार दिवसात ‘नटसम्राट’ या चित्रपटाने ३५.१० कोटींची कमाई केली.

नटसम्राट चित्रपटाने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटाबरोबरच दुनियादारी, टाईमपास या चित्रपटांना देखील मागे टाकले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नटसम्राटने नवा विक्रम केला आहे.

‘नटसम्राट’ हा चित्रपट नव वर्षाच्या सुरूवातीला १९० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या संवादाने प्रेक्षकांना मोहिनी घातली. ‘नटसम्राट’ ने एका आठवड्यात १६ कोटी रुपयांची कमाई केली होती.

दरम्यान, नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांचे आणखी नवे संवाद या चित्रपटात टाकण्यात आले असून नव्याने हा चित्रपट २२ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे हा चित्रपट आणखी कमाई करण्याची शक्यता आहे. असा विक्रम मराठीतील कोणत्याही चित्रपटाने केलेला नाही.
comments