पद्मश्री दर्शनाजी जव्हेरी यांच्या मणिपुरी नृत्याने अंबाजोगाईकर भारावले

05-02-2016 : 05:30:34
     452 Views

बीड (प्रतिनिधी)

दरवर्षीप्रमाणे भरतनाट्यमनृत्यगुरू शारदापुत्र विनोद निकम तथा संचालक पंचमवेद अकॅडमी ऑफ फाईन आट्र्स अ‍ॅण्ड कल्चर या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील व विदेशातील कलावंताना कलाक्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ‘पंचमवेद नृत्यरत्न पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षीचा बहुमानाचा पंचमवेद नृत्यमहर्षी हा पुरस्कार पद्मश्री व पद्मविभूषण गुरू डॉ. कनक रेळे (मोहिनी अट्टम नृत्य, मुंबई) व पद्मश्री दर्शनाजी जव्हेरी (मनीपुरी नृत्य, मुंबई) यांना देण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक ३० व ३१ जानेवारी रोजी लोकनेता स्व. विलासरावजी देशमुख न.प. सभागृह येथे संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून आ.आर.टी. देशमुख, आ. संगिता ठोंबरे, प्रमुख पाहूणे दाजीसाहेब लोमटे, भगवान शिंदे, प्रा. रंगनाथ तिवारी, कमलाकर कोपले, शैलेष कुलकर्णी, डॉ. शुभदा लोहिया, रविंद्र जाधव, सौ. मंगला कुलकर्णी, सुभाष कुलकर्णी, सौ. शारदा निकम, कमलाकर निकम, तसेच अकादमीचे संचालक व गुरू सौ. अनुराधा निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. नृत्यांजली कार्यक्रम प्रसंगी पद्मश्री दर्शनाजी जव्हेरी यांच्या मनीपुरी शास्त्रीय नृत्यशैली सादरीकरणाने अंबाजोगाईतील रसिक भारावून गेले आणि त्यांच्या कलेला उभा राहून दाद दिली व टाळयांच्या जयघोषात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये देशातील वेगवेगळया राज्यातील ३८ कलावंताना योगेश्वरी नृत्यरत्न, दासोपंत नृत्यरत्न, शकुंतला नृत्यरत्न, नृत्यतपस्वी, नृत्यसाधक व नंदकुमार नृत्य अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडीसा, पश्चिम बंगाल, गुजरात, हरियाणा, दिल्ली तसेच महाराष्ट्र इ. राज्यातील व हाँगकाँग देशातील कलावंतानी उत्सफुर्त सहभाग नोंदवला होता. तसेच अंबाजोगाई पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दासोपंत ललीतरत्न पुरस्कार देऊन सम्नानित करुन गौरवीण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश कुलकर्णी, आनंद जोशी, प्रविण सातपुते, रत्नाकर निकम, गिरीष बिडवे, डॉ. संपदा गिरगांवकर, आकाश गोरे, अशोक बिडकर, सदानंद गोरे, संजय फड, सतिष बलुतकर, श्रीकांत धायगुडे, नाट्यशास्त्र विभाग स्वा.रा.ती महाविद्यालय व पंचमवेद अकादमीच्या सर्व विद्यार्थी व पालकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली गोस्वामी व शषी रमेश (म्हैसूर), मंदीरा जोशी (गोवा) यांनी केले.नृत्यमहर्षी गुरू डॉ संध्या जी पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
comments