‘संस्कृत आणि मराठीचे नाते’

04-02-2016 : 07:50:26
     615 Views

आपण जी भाषा बोलतो तिच्याविषयी कधी विचार केलायत का ? आपल्या मायमराठीमध्ये संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे वापरले जातात. इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये ते वापरले जातात. तरीही संस्कृतातील शब्द मराठीत वेगवेगळ्या प्रकारे कसे वापरले जातात किंवा काहीवेळा तर चक्क त्यांचा अर्थही पूर्णपणे वेगळाच असतो, अगदी दैनंदिन व्यवहारातसुद्धा आपण जी वचने, म्हणी, शब्द ऐकतो ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम संस्कृतात असल्याचे आपल्याला माहित नसते.

मराठी भाषेत वापरण्यात येणारे चिन्ह, जान्हवी, आल्हाद, माध्यान्ह हे सारे शब्द मूळ संस्कृत शब्दच आहेत. आणि संस्कृतमध्ये ते चिह्न, जाह्नवी, आह्लाद, माध्याह्न असे लिहिले जातात मात्र मराठी भाषेत आपण स्पेलिंगच बदलून टाकले आहे. पण हिंदीत हे शब्द मूळ आहेत तसेच लिहिलेले दिसतात. असेच काही नावांच्या बाबतीतही आहे. पहाटेच्या वेळी अर्धवट दिसणाऱ्या सूर्यबिंबाला ‘सविता’ म्हंटले जाते तर मधल्यावेळी किंवा संध्याकाळच्या वेळी त्याला ‘सूर्य’ म्हणतात. म्हणजेच प्रत्यक्षात ‘तो सविता’ असताना आपल्याकडे सविता हे मुलीचे नाव ठेवले जाते. आणखी एक उदाहरण म्हणजे गायत्री या नावाचेः ‘गायत्री’ हा ‘मंत्र’ असून तेही सूर्याचेच नाव आहे, तरीही ते नाव मुलीचेच ठेवलेले आपण पाहतो. काही पुस्तकांवर तर गायत्री देवी मानून स्त्री आकृती रेखाटलेली पाहिली की खरंच गम्मत वाटते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे नाव ऐकून आणि वाचून मजा वाटते पण जरासा विचार केला तर येडीयुरप्पांचे मूळ नाव ‘यदुवीरप्पा’ असल्याचे समजते. भारतात तर अशी कित्येक नावे आहेत की जी स्त्री आणि पुरूष दोनही लिंगामध्ये आढळतात. जसे प्रांजल, किरण, सोनल, दीपल, ज्योती, शशी, उमंग, अनुपम, मनप्रीत,भूपिंदर इत्यादी. लिखित भाषेप्रमाणे अर्थाच्या दृष्टीनेही मराठीत काही संस्कृत शब्दांचे अर्थ आपल्याला मूळ अर्थाच्या बरोब्बर उलटे आढळतात, तर काहींचे पूर्णपणे वेगळे. जसे संस्कृतात ‘परोक्ष’ आणि ‘अपरोक्ष’ असे दोन शब्द आहेत. ज्यांचा अर्थ अनुक्रमे ‘अप्रत्यक्ष’ आणि ‘प्रत्यक्ष’ आहे पण मराठीत यांचा शब्दप्रयोग उलटअर्थी केला जातो. कटू हा शब्द संस्कृतात कडू आणि तिखट असे दोन्ही अर्थ घेऊन येतो. मराठीत मात्र कटू म्हणजे कडू आणि तिख्त म्हणजे तिखट या अर्थी उल्लेखला जातो तर संस्कृतात ‘तिक्त’ शब्द ‘कडू चव’ दर्शवण्यास वापरतात. मराठीत कटू वचनांनी घायाळ करणे किंवा कटू बोलणे, एखाद्याला झोंबणे असे शब्दप्रयोग केले जातात तेव्हा मात्र संस्कृतमधील कटू शब्दाचा तिखट हाच अर्थ अभिप्रेत असतो! इतरही भाषांमध्ये अशा गमती सापडतात. ‘सत्कार’ शब्दाचा मराठीत अर्थ आहे सन्मान, तर बंगाली भाषेत सत्कार म्हणजे अंत्यसंस्कार.. मल्याळी भाषेत कल्पना म्हणजे आज्ञा, प्रसंग म्हणजे व्याख्यान, अपेक्षा म्हणजे विनंती.

वा न वा

वा न वा भासणे असा शब्दप्रयोग आपण ऐकतो, त्याचे मूळ एका सुभाषितात सापडते, ते असे, ‘शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पंडित:ख वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा खख’
याचा अर्थ असा की, शंभरातून एक शूर निपजतो, सहस्र लोकांतून एक पंडित, दशसहस्रांतून एक वक्ता मिळतो मात्र दाता ( नि:स्वार्थपणे दान करणारा) मिळणे खूप अवघड असते, त्याची वा न वा भासते.

तारांबळ उडणे

लग्नाच्या प्रसंगी भटजींच्या तोंडातून ‘तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ख’ असे ऐकले असेलच. विवाहमुहुर्ताची वेळ जवळ येऊ लागली की ती साधण्यासाठी भटजींची मंत्र म्हणण्याची घाई होते म्हणजेच या ‘ताराबलं’ शब्दावरून मराठीत तारांबळ हा शब्द आला असावा.

अति तेथे माती

‘अतिदानात् बलीबद्धो ह्यातिमानात्सुयोधन: ख विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत् खख’

अतिदान केल्यामुळे बळीराजा बांधला गेला, मोहामुळे रावणाचा नाश झाला व अति गर्वामुळे सुयोधन पराभूत झाला म्हणून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अति तेथे मातीच होते.

‘नाकी नऊ येणे’ किंवा हिंदी भाषेत ‘नाक में दम आना’

या म्हणीचा उगम भगव्द्गगीतेत सापडतो. ‘नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ख’ माणसाच्या मृत्यूवेळी दोन कान, दोन डोळे, दोन नासिका, मुख, गुदद्वार व मूत्रद्वार अशी नऊ रंध्रे बंद होतात सर्व प्राण नाकावाटे बाहेर जातात. नाकी दम येणे म्हणजेच मृत्यूक्षणी जशी बिकट अवस्था होते तसा प्रसंग ओढवणे या अर्थी वापरण्यात येतो.

भाषेतले शब्द शिकण्यासाठी दोन पद्धती आहेत. परंतु त्यावर प्रत्येक संशोधकाचे वेगवेगळे मत आहे. एका पद्धतीत प्रत्येक अक्षर आणि त्याचे उच्चार (हिेपेसीरा) शिकणे आणि मग त्याची जोडणी करणे. दुसऱ्या पद्धतीत संपूर्ण शब्दच शिकणे असते, ज्यात प्रत्येक शब्दाचा उच्चार अपेक्षित नसतो. ह्या पद्धतींना अनुसरुन पुढे भाषा शिकण्यासाठी फोनोग्राम्स (किंवा फोनिक्स) आणि फ्लॅशकार्डचा वापर केला जातो. समजा इंग्रजीत लरीं शिकवायचे असेल तर फोनोग्राम्स नुसार क, ऍ, ट अशी फोड करुन शिकवावा लागतो. शब्दांबरोबरच त्याच्या उच्चारांनाही खूप महत्त्व आहे. आपण भारतीय लरीं ‘कॅट’ असा पूर्ण उच्चार करू पण अमेरिकन किंवा युरोपीन त्यामध्ये ‘क’ बरोबर ‘ख’ चा सूक्ष्म उच्चार जोडून ‘खॅट’ म्हणतील. फुलाला इंग्रजीत आपण ‘फ्लॉवर’ (‘र’ वर जोर देत) म्हणतो तर परदेशी उच्चार आहे ‘फ्लार’

संस्कृत भाषेविषयी थोडेसे ..

वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति ।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’ , हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच राहतो -
‘आम्रं खादति रामः ।’ ‘खादति रामः आम्रं ।’
याउलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, वेगळाच अर्थ होतो, उदा. ‘ठरा शरींी ारपसे.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’ , हे वाक्य ‘चरपसे शरींी ठरा.’ असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’

गणित आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून संस्कृतचा वापर तिच्या परिपूर्ण आणि अचूक व्याकरणामुळे जास्त होऊ शकेल असे जाणकारांचे मत आहे. पाणिनीच्या सुमारे चार हजार सूत्रांनी बांधलेल्या संस्कृत व्याकरणामुळे ही भाषा समृद्ध बनली आहे. सर्वसाधारणपणे कुठलीही भाषा जन्मल्यापासून किंवा कोणतीही वैज्ञानिक संकल्पना शोधली गेल्यानंतर काळानुसार त्यामध्ये अनेक बदल घडतात. परंतु संस्कृत ही एकमेव अशी भाषा आहे की ज्या भाषेचा वापर गेल्या अनेक वर्षात, काहीही बदल, सुधारणा न होता अव्याहत सुरू आहे. हे पाणिनीच्या व्याकरणाचे वैशिष्ट्य आहे.
‘संस्कृत’ या शब्दाचा अर्थच मुळी सर्व प्रकारचे संस्कार केलेली परिपूर्ण (‘लोश्रिशींश’ किंवा ‘शिीषशलीं’ ) भाषा असा आहे. प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंतचे व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशीला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. आजही जर्मनी, युकेसारख्या देशात संस्कृतचे अध्ययन केले जाते. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन पंथीयांच्या उपासनेत संस्कृतभाषा वापरलेली आढळते. भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक संस्कृत असून नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. कदाचित म्हणूनच की काय आजच्या शिक्षणमंत्र्यांनासुद्धा शाळेतील मुलांना संस्कृत अनिवार्य करण्याचे शहाणपणाचे वाटत असेल.

- स्वप्ना काळे
comments