पुन्हा एकदा ‘इथे ओशाळला मफत्यू’


मराठेशाहीचा इतिहास रचणारे छत्रपती शिवाजी महाराज जितके मानाचे तितकेच महत्वाचे स्थान छत्रपती संभाजी राजे यांनाही होते. स्वराज्य आणि रयतेच्या कल्याणासाठी लढणारे सच्चे लढवय्ये, नसान्सात मराठी बाणा जपणारे अफाट ताकदीचे छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास आजही मराठी मनात जागफत आहे. मराठी चित्रपटसफष्टीच्या सुवर्णकाळात ऐतिहासिक चित्रपटांचा आणि नाटकांचा समावेश खूप होता. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या संघर्षमय जीवनावर आधारीत काही चित्रपट आणि नाटके होती. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ , ‘राजसंन्यास’ ‘छावा’ तसेच ‘बेबंदशाही’ सारखी दर्जेदार मराठी नाटके नाटय़सफष्टीत मानाची ठरली. त्यातीलच एक प्रचंड गाजलेले नाटक म्हणजे प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मफत्यू’ या नाटकाने मराठी नाटय़रसिकांच्या मनावर राज्य केले. हे नाटक पुन्हा एकदा नव्या संचात रंगभूमीवर दाखल होणार आहे.

नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांनी या नाटकाला, मराठय़ांच्या इतिहासाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहचवले. प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेला औरंगजेब आणि अनेक मान्यवर कलाकारांनी संभाजीची भूमिका अजरामर केली आहे. किती तरी पिढय़ांनी केवळ संभाजी व्यक्तिरेखा अनुभवण्यासाठी हे नाटक पुन्हा पुन्हा पाहिले. ही भूमिका साकारणे जितकी आनंद देणारी आहे तितकीच आव्हानात्मक आहे. कलेचा मापदंड मोजणारे प्रेक्षक आजही शंभूराजेसारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेच्या प्रेमातच नव्हे तर त्या कलाकृतीची वाट पहात असतात. असे हे अजरामर ऐतिहासिक वारसा जपलेले ‘इथे ओशाळला मफत्यू’ हे नाटक निर्माते नामदेव नाक्ती यांनी वैष्णवी थिएटर्स, मुंबई या बॅनरखाली नव्या संचात ताकदीचे कलाकार घेऊन रंगमंचावर आणत आहेत. नटश्रेष्ठांच्या तालमीत तयार झालेले रवींद्र खैरे हे नाटक दिग्दर्शित करीत आहेत. ‘इथे ओशाळला मफत्यू’ या नाटकाचे निर्माते नामदेव नाक्ती हे तरुण बांधकाम व्यावसायिक असून नाटय़प्रेमी आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या व्यक्तिरेखेवर प्रभावित झाल्यामुळे आपण या नाटकाची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. दिग्दर्शक रवींद्र खैरे यांनी या नाटकात दिग्दर्शनाबरोबरच नटश्रेष्ठांनी साकारलेली औरंगजेबची भूमिका करणार आहेत. या ऐतिहासिक नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी राम सागरे आणि मंडळी सांभाळणार आहेत.

‘इथे ओशाळला मफत्यू’ या नाटकात संभाजीच्या तडफदार भूमिकेत शंतनु मोघे, येसुबाई डॉ. शाल्वी भोसले, गणोजी जयंत पानसे आणि औरंगजेब रवींद खैरे यांच्या महत्वाच्या भूमिका असून चंदन जमदाडे, समाकांत पाटील, दिनेश शिंदे, प्रभाकर आचरेकर, समीर घाणेकर, सागर पेंढारी, मधुसूदन पेडणेकर, सिद्धेश कांदळगांवकर यांच्याही यात भूमिका आहेत. या नवीन वर्षात इतिहास प्रेमींना आणि नाटय़ रसिकांना तसेच नव्या पिढीला संभाजी कळावा यासाठी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल होणार आहे
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)