भाषा आणि संस्कृती

19-02-2015 : 09:21:30
     387 Views

यकासराभर दिवस वर आला तरी झोपून राहय़लाय्’ . आमच्या गावाकडे सकाळी उशिरा उठणाऱयाबद्दल हमखास कोणीतरी हे म्हणायचंच किंवा बैलगाडीतून मळय़ात जाताना कोणी शहरी पाहुण्यानं विचारलं की, यकिती अंतर राहय़लय्?’ तर गाडीवानाचं उत्तर असायचं, यहय़े काय कासराभरावर मळा हाय्!’ म्हणजे यकासरा’ हे एक मोजमाप (परिमाण) बोलीभाषेत वापरलं जायचं ते भूमीवरचं अंतर मोजण्यासाठी. यकासराभर दिवस, कासराभर सूर्य आला’ असं सांगण्यासाठी! खरं तर खेडेगावात कासरा म्हणजे वाखाचं जाड वळलेलं भक्कम दोरखंड! बैलांना बांधण्यासाठी किंवा अवजड वस्तुंसाठी बांधायला! जसं मोटेला बांधायला. आता यमोट’ च इतिहासजमा झालीय् गावातून! यमोट-नाडा’ असा जोडशब्द सहसा असायचा! हा यनाडा’ म्हणजे कासऱयापेक्षा भक्कम आणि जाड! कारण विहिरीतून मोट पाण्याने भरून दिवसन्दिवस ओढण्याचा भार सहन करण्याची ताकद त्यात असावी लागते. म्हणून यतो’ नाड/यती’ नाडी नव्हे. कारण भक्कमपणासाठी व्याकरणातला पुल्लिंगी शब्द हवा! आता कासरा, मोट, नाडा बदलत्या यांत्रिक कृषी संस्कृतीबरोबर लोप पावले. सकाळची वेळ मोजायला आता आकाशात सूर्य किती वर आलाय् हे सांगण्याऐवजी घडय़ाळ यकाटेकोर’ वेळ सांगतं खेडय़ातही! जमिनीवरचं अंतर मोजायला आता यकासरा’ तर गेलाच पण यकोस, मैल’ ही संपले. आता खेडय़ातल्या बोलीतही आले यकिलोमीटर’ - कि.मी.

असे कितीतरी देशी शब्द मराठीच्या दैनंदिन वापरातून अस्तंगत होत आहेत. भाषा मानवी समूहाच्या जगण्याचं चालीरिती-रूढींचं, प्रथा-परंपरांचं, श्रद्धांचं प्रतिबिंब वागवीत असते. या सगळय़ातून त्या त्या समाजाची संस्कृती प्रतिबिंबीत होत असते. म्हणजेच या बाबी बदलल्या, लोप पावल्या की संस्कृती बदलते. संस्कृती बदलली की भाषा बदलते अर्थात ती एकदम बदलत नाही- हळूहळू नकळत बदलते.

समाजाच्या एका थरातून प्रथा-परंपरा अस्तंगत होत जातात. त्यांच्याशी निगडित शब्दांचा, वाप्प्रचारांचा वापरही कमी कमी होत जातो. कधी कधी मात्र ते शब्द तसेच अवशेष म्हणून शिल्लक राहतात. संस्कृतीच्या पूर्वस्मृतींचे अवशेष म्हणून! मग त्या शब्दाचा नेमका अर्थ कळत नाही.

कोकणात एका घरी गेले तर घरातल्या एका व्यक्तीचं जेवण पाहून आजीबाई म्हणाल्या यकाय बोडण भरल्यासारखं करतोयस.’ तोपर्यंत मी यबोडण’ हा शब्द क्वचितच ऐकला होता. योगायोगानं त्या घरातलं एक लग्न झाल्यावर एक कुळाचार होता. ते यबोडण’ तिथे पाहिलं, अनुभवलं. कोकणातल्या ब्राह्मणांमध्ये लग्नानंतर वधूने अन्य सुवासिनींसह करायची ही यअन्नपूर्णेची’ एक परीने उपासना! दही, दूध, पुरणपोळी इ. इ. पदार्थ एका मोठय़ा परातीत मधोमध ठेवलेल्या यअन्नपूर्णेच्या’ इवल्याशा मूर्तीवर पातेल्यानं ओतून भोवताली सर्व बायकांनी बसून हाताने ते सगळं मिश्रण एकजीव करेपर्यंत कालवायचं. तोंडानं लोकमंत्र पुटपुटायचे. हे सगळं पाहय़ल्यावर भारतात भाजी, आमटी, कोशिंबीर इ. इ. पदार्थ एकदम ओतून कालवून खाणारा त्या कुटुंबातला सदस्य यबोडण’ भरल्यासारखं जेवण करत होता म्हणजे काय ते कळलं आणि एखाद्या उपेक्षित व्यक्तीला एकाच ताटात सरमिसळीने अनेक पदार्थ अनास्थेनं वाटून जेवणाचं ताट दिलं की, यपुढे बोडण वाढून देतात झालं!’ या खेदपूर्वक उच्चारलेल्या वृद्ध व्यक्तीच्या शब्दांतील गर्भितार्थही कळला. पण हे यबोडण’ कोकणातील त्या स्तरातल्या एका विधीतून आलेला-संस्कृतीच्या अवशेषाचा भाग आहे. प्रादेशिक म्हणूया. म्हणजे विविध प्रादेशिक संस्कृतीची प्रतिबिंबे त्या त्या प्रदेशातल्या (भाषा एकच मराठी असली तरी) बोलीत शिल्लक राहतात.

काहीही खास कामाशिवाय गावभर हिंडणाराला किंवा हिंडणारीला आमच्या गावाकडे (प. महाराष्ट्रात) यबेल घालत दारोदार हिंडणे’ म्हणत. हे यबेल घालणे’ आता त्या गावातही कोणाला सहसा कळणार नाही. कारण बलुतेदारीच्या पद्धतीत घरोघर बेल-फुले वगैरे सकाळी पोचवण्याचे काम पुजारी (शंकराचा) गुरवाकडे असे. आता ते यबेल घालणे’ थांबले असले तरी वाप्प्रचार राहिला. तसाच थोडय़ाफार फरकाने रात्री-अपरात्री भटकणाऱयाला कोकणात यदेवचारासारखा भटकतो’ म्हटले जाते. तर विजापूर भागातल्या कानडी-मराठी सीमा प्रदेशात तो यगोल्लासारखा म्हणजे कामाशिवाय उगीचच, फिरणारा’ म्हणून संभावना होते. प्रादेशिक संस्कृतीचे प्रतिबिंब घेऊन भाषा मनी-मुखी वावरत असते. असाच निरुद्देश भटकणारा असला तर आमच्या गावात यसतरा पिंपळावरचा मुंजा’ म्हणूनही त्याची संभावना होई. हल्लीच्या इंग्रजाळलेलं मराठी बोलणाऱयांना यमुंजा’ म्हणजे मुंज झालेली पण सोडमुंज व्हायच्या आत कोणी मुलगा मेला तर त्याचं भूत होतं आणि ते पिंपळाच्या झाडाच्या आश्रयानं राहतं, हा पारंपरिक लोकसमज (आता अंधश्रद्धा म्हणा हवी तर) माहीत नसेल तर यसतरा पिंपळावरचा मुंजाही’ कळणार नाही- पुन्हा अनेकांना यमुंज’ आणि यसोडमुंज’ शब्दांच्या मागच्या प्रथांचा गुंतवळाही उलगडून दाखवावा लागेल, तो वेगळाच.

एखादा तरुण वयस्कर माणसासमोर फार शहाणपणा दाखवायला लागला तर म्हातारा किंवा म्हातारी म्हणे, यअरे एवढासा होतास तेव्हापासून पाहतोय. फार शहाणपणा करू नकोस. तुझ्या यबारशाच्या घुगऱया’ खाल्ल्या आहेत मी!’ या बारशाच्या यघुगऱया’ असतात तरी कशा? हा मलाही प्रश्न पडला होता. वाप्प्रचार मी लहानपणापासून ऐकत आले होते. अखेर अगदी ग्रामीण भागातल्या माझ्या एका सखीने तिच्या घरी जन्माला आलेल्या बाळाच्या बारशाला शिजवलेल्या जोंधळय़ाच्या घुगऱया माझ्या घरी आणून खाऊ घातल्या होत्या. दुर्मिळ होत चाललेल्या अशा प्रथा, वस्तू पदार्थांची नावे भाषेत शिल्लक राहतात आणि मग शब्दांशी खेळायचा चाळा असेल तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन शोध लावण्याची गंमतशीर धडपड सुरू होते.

तसेच धान्य साठवण्याची बांबूच्या नाहीतर केकताडाच्या कामटय़ांनी घट्ट विणलेली सहा ते आठ फूट उंचीची, चार फूट व्यासाची गोल उभ्या पिंपासारखी कणिंग- खरे तर अनेक कणंगी आमच्या गावातल्या घरी असत. आतून-बाहेरून शेणाने सारवून त्या घट्ट हवाबंद करून त्यात धान्य भरून ठेवीत. ती यकणिंग’ ही आता शब्दशेष झाली आहे. ही झाली घरातल्या धान्य साठवण्याची सोय!

तशीच मोठय़ा प्रमाणात गावासाठी धान्य साठवण्यासाठी किंवा किल्ल्यांवरच्या धान्य साठय़ासाठी यपेवे’ बांधलेली असल्याचे उल्लेख येतात. कोल्हापूरच्या पन्हाळगडावर असे यपेवांचे’ अवशेष दिसतात. पण मी खरी पेवं पाहिली ती तंजावरला. व्यंकोजीराजे भोसले (शिवछत्रपतींचे बंधू) यांच्या वंशजांच्या किल्ल्यातल्या वाडय़ात. त्यात काजू साठवीत असत, अशी माहिती मिळाली होती. एखाद्या व्यक्तीनं काही महत्त्वाच्या विषयासंबंधी बोलायला प्रारंभ करण्याआधी मूळ मुद्दा बाजूला ठेवून अवांतरच बोलत राहिलं तर यनमनालाच धडाभर तेल’ खर्च केल्यासारखं वाटे. कोणत्याही शुभारंभप्रसंगी देवाला प्रथम नमन (प्रार्थना) करण्याची प्रथा आहे. ती सुटसुटीत असावी, ही अपेक्षा! कोकणात यनमन’ -खेळे म्हणून लोकनाटय़विष्कार आहे. इतरही लोकनाटय़विष्काराचा प्रारंभ इष्ट देवतेच्या यनमनगीताने’ होतो. पूर्वी हे सगळे यखेळ’ दिवटय़ाच्या किंवा पलित्यांच्या उजेडात होत. तो उजेड सतत रहावा म्हणून अधूनमधून त्यावर यबुधली’ मधून तेल ओतावे लागे. यनमन’ लांबले तर यधडाभर’ (दहा शेर) तेल नमनातच खर्च होई, हा आशय! थोडी अतिशयोक्तीही आहे त्यात! आता यबुधली’ मधून तेल ओतायचं, ती यबुधली’ (विशिष्ट आकाराचे लहान तोंडाचे तांब्या-पितळेचे तेलाचे भांडे) तर एखाद्या वस्तुसंग्रहालयात यअँटिक पीस’ म्हणूनच दिसली तर दिसेल.

भाषा आणि संस्कृती अशा सतत हातात हात घालून नांदतात, बदलतात. आता जास्त उदाहरणं दिली तर यजिभलीनं केलं अन् बुधलीभोवती आलं’ , अशी माझी अवस्था होईल, म्हणून थांबते.
comments