स्त्री मुक्तीचे प्रणेते-बाळशास्त्री जांभेकर

05/01/2013 20 : 2
     484 Views

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे समजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. सामाजिकीकरण ही एक प्रक्रिया असते. त्याद्वारे लोकांना सामजिक संकेत, भुमिका, कार्य आणि मुल्य याबाबतचे शिक्षण अव्याहतपणे दिले जाते. आज दर्पण दिनाच्या निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राच्या इतिहासाचा आणि त्याद्वारे स्त्रीमुक्ती साठी केलेल्या प्रयत्नांचा घेलेला हा आढावा.आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मुंबईहून दर्पण पाक्षिकाचा शुभारंभ केला. या दिवशी पहिले मराठी पत्र जन्मले. दर्पण हे मानपत्र असल्याने त्यात वृत्तापेक्षा लोकांना काहीतरी संगण्याला, समजावून देण्याला अधिक प्राधान्य व महत्त्व दिले जात होते. दर्पण करांनी पेशवाईच्या अस्तानंतर गलितगात्र झालेल्या समाजाला पाश्चिमात्य सुधारणांची नवी दृष्टी दिली.
दर्पण कार हे स्त्री -पुरूष समानतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या दर्पण या पत्रातून मांडलेले स्त्रीमुक्तीविषयक विचार हे त्यांच्या प्रगमनशील सामाजिक सुधारणा विचाराचे प्रतिक होते. त्यांनी विधवा पूनर्विवाहाचा पुरस्कार केला. स्त्रीयांची अवनती होण्याचे मुख्ये कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे. हे त्यांनी ओळखले होते.
महाराष्ट्रामध्ये राजा राममोहन रॉय यांच्या सुधारक विचारांची ओळख प्रथम त्यांनीच आपल्या दर्पण पत्रामधुन करून दिली बंगालमध्ये स्त्रीमुक्ती विषयी जे कार्य राजा राममोहन रॉय यांनी केले. तेच कार्य महाराष्ट्रात जांभेकरांनी केले. एवढेच नव्हेतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रगतशील विचारांचा धागा मजबुत केला.
जांभेकरांची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी उदारमतवादी होती त्याबाबतीत ते म्हणतात. हिंदुस्थानमधील सर्वच स्त्रियांचा विद्याभ्यास वाढत जावा अशी माझी इच्छा आहे. तर असे प्रौढ शिक्षणाकडे तुम्ही आपले गुण लावून स्वदेशीय लोकांपासून शाश्वत प्रतिष्ठेचा तुम्ही पाया घाला. स्त्रियांचे शिक्षण हा स्वदेशीय लोकांच्या प्रतिष्ठेचा पाया आहे. असा विचार बाळशास्त्री करतांना दिसतात.
१८३० साली बंगालमध्ये सतीची प्रथा कायद्याने बंद करण्यात आली होती. १८३७ मध्ये बाळशास्त्रींनी सातारा व जाफराबाद येथे दोन स्त्रिया सती गेल्याची नोंद केली आहे. माळवा भागामध्ये १८३५ साली बालहत्या प्रथा रूढ असल्याचेही ते सांगतात. स्त्रियांची ही कोंडी त्यावेळच्या चालीरीती, प्रथा व रूढींच्या भयावह राक्षसी प्रथेमुळे होत होती. हे दर्पण मधील वर्णन वाचून लक्षात येते. स्त्री शिक्षणाचा प्रसार, बालविवाह विरोध तसेच सती प्रथेस विरोध अशा सर्व प्रश्नांवर त्यांनी परखड व तर्कशुद्ध मते मांडली, तसेच विधवा पुनर्विवाह चळवळीस समर्थन दिले.
बाळशास्त्री जांभेकरांच्या सुधारक दृष्टीकोनामुळे नवी स्थित्यंतरे घडून आली. स्त्री मुक्ती चळवळीस नवी दिशा मिळाली. अशा ‘दर्पण’ कारास दर्पणदिनी विनम्र अभिवादन.
comments