वकीला प्रमाणे पत्रकारांचीही नोदंणी होणे आवश्यक

16/11/2012 15 : 0
     475 Views

१९८० पर्यत भारतात प्रिंट मिडीयाचीच चलती होती मात्र त्यानंतर रेडीओ व दुरदर्शन सरकारी प्रासारणासाठी सुरू झाले.१९९० नंतर या क्षेत्रात फार मोठे बदल होऊ लागले. मोठयायप्रमाणात प्रिटंमिडीयाचा विस्तार झाला.वेगवेगळया भाषेतील तसेच जिल्हा स्तरावरही दैनिके सुरू झाली. १९९५ नंतर इलेक्ट्रानिक मिडीया मोठया प्रमाणात प्रासारित झाला.व त्यांचा वेग वाढत राहिला.त्यामुळे मिडीया क्षेत्रात काम करणा-याना मागणी मोठया प्रमाणात वाढली त्याचा परिणाम वेगवेगळया विद्यापीठांनी पत्रकारितेचे अभ्यासक्रम मोठयाप्रमाणात सुरू केले. मागील २ दशकात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पदवीधराची संख्या झपाटयाने वाढत आहे. मागणी प्रमाणे पुरवठा नाही झाला तर कोणत्याही व्यावसायात समस्या निर्माण होतात अशाच समस्या पत्रकारितेच्या क्षेत्रातही आपणास पहायला मिळत आहेत.
मिडीयाला काही लोकंनी व्यापाराचे स्वरूप दिल्याने समाजिक जिमेदारी,नैतिकमूल्य हे आडळीला पडले आहेत. या क्षेत्राचे गॅल्यामर व पैसा पाहून अनेक तरूण तरूणी या क्षेत्रात येण्यासाठी हे क्षेत्र निवडत आहेत व अभ्यासक्रंम पुर्ण करून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. परंतू या क्षेत्राच्या बारकाव्याशी व अपरिपक्वतेमुळे मिडीया क्षेत्रात सामाजिक हिताला व विकासाला जे महत्व द्याला पाहिजे तेथे व्यावसायीक स्वरूप आले आहे.यामुळे भौतीक चगंळवादाला चालना मिळत आहे. अशा स्थीतीत मिडीयावर नियत्रण ठेवण्यासाठी पत्रकाराची भूमिका व जबाबदारी काय आहे हे ठरवणे महत्वाचे आहे.भारतीय प्रेस कायद्यामध्ये दैनिकाचे मुद्रण,प्रकाशन,व सपांदक यांनाच जिमेदार मानून भारतीय प्रेस कौसील कडे मिडीयावर नियत्रंण ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य सोपविले आहे.आता स्थिती पूर्णता बदलेली आहे.अशा स्थितीत भारतीय प्रेस कौसीलला सुध्दा बार कौसील ऑफ इंडिया प्रमाणे अधिकार संपन्न बनवून माध्यमात कार्यकरणा-याना भारतीय प्रेस कौसील व प्रेस अ‍ॅक्ट च्या नियत्रंणाखाली आणून त्याला नियंत्रीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात प्रेस कौसील व जिल्हयात पत्रकार परिषदेची आवश्यकता निर्माण झाली आहे.पत्रकारितेत रिपोर्टर,सहाय्यक संपादक,संपादक,फोटोग्राफर याच्या बरोबर इलेक्ट्रानिक मिडीया व वेब मिडीयाला सुध्दा सामावून घेण्याचा विचार महत्वाचा बनला आहे.
बार कौसील प्रमाणे प्रत्येक राज्यातही प्रेस कौसीलची निर्मिती केली पाहिजे तसेच जिल्हा पातळीवर जिल्हा पत्रकार प्रेस परिषदेची तसेच तहसील स्तराव एकच पत्रकार संघाचे संघटन करणे गरजेचे आहे. प्रत्येक राज्याच्या पत्रकार परिषदेने व्यासायीक पत्रकारांना सदस्य बनवून त्याची कार्यप्रणाली ठरवली पाहिजे,त्यांचे हित त्याची जिमेदारी,नैतिक्ता इत्यादी च्या संबधीचे सर्व निर्णय व पहाणी राज्य प्रेस कॉन्सील करेल.त्यासाठी विविध भागातील पत्रकारांना सदस्यत्व देवून पदाधीका-याची निवड केली पाहिजे.जिल्हा व तहसील स्तरावर आसोसिएशन किवा संघ यांच्या माध्यमातून या पेशातील कार्यरत व्यक्तीची नोंदणी,व्यवसायाची स्वतंत्रता त्याचे कर्तव्य इत्यादी वर नियत्रंण करणे हे अधिकार कायद्याने प्राप्त होणे आवश्यक आहेत. पत्रकारितेत असलेल्या सर्व व्यक्ती व त्यांचा अनुभव व शिक्षण यांच्या माध्यमातून जे शक्य आहे ते त्याचे मुल्यमापन करून त्यांना राज्य प्रेस कौसीलचे सदस्य बनवून मुख्यप्रवाहात जोडणे आवश्यक आहे.
मला अशा आहे की या विषयावर माध्यमात एक नविन विचार,संवाद,चर्चा होईल त्यामुळे बदलत्या माध्यमाना एकजुट करता येईल.
comments