पुन्हा बळीच राज्य येऊ दे ...!

14/11/2012 17 : 14
     783 Views

भारत हा कृर्षीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.या देशातील ७० % लोक कृर्षी म्हणजे शेती व शेतीपुरक व्यवसायशी निगडीत आहेत.देशात शेतक-याला समोर करून अनेक करोडो रूपयाच्या योजना घोषीत होतात त्याची कागदोपत्री आमलबजावणी होते,पंरतु लाभधारक दुर राहुन दुसरेच बाडगुळ या सर्व योजनाचा लाभ घेताना दिसतात.आजच्या मितीला महाराष्ट्रतील शेतकरी सर्वच बाजुनी कोडीत सापडला आहे.निर्सगाने पाठफिरवली,शेती उत्पादनाला योग्य भाव नाही,आवाज उठवला तर मनगटशाहीच्या जोरावर चिरडला जात आहे,सावकारही दारात फिरकू देत नाही,बॅका हात वरकरत आहेत त्यात केंद्र व राज्य सरकार मोठमोठ्या उद्योगांना प्रोहत्साहन देत आहे व करोडोरूपयाची सबशीडी देत आहे या बळीराजाकडे लक्ष देयला कोणी वाली राहीला नाही जो बळीराजा सपूर्ण देशाला आण्ण धान्य पुरवतो तोच आता हवाल दिल झाला आहे.सगळया पातळयावर या बळीराजाची उपेक्षा व परवड होत आहे.
ज्यांना महाराष्ट्र आदाराने रयतेचाराजा,जानता राजा असे संबोधतो तेच शेतक-यांच्या जीवाशी खेळत आहेत.हे ऊस आदोंलनावरू सर्व महाराष्ट्राने पाहील आहे.सर्वत्र बळी तो कान पीळी अशी परिस्थीती संपुर्ण महाराष्ट्रत निमार्ण झाली आहे याचा जाब येणा-या निवडणूकित मतदार रूपी बळीराज व सामान्य जनता विचारल्याशिवाय राहना नाही.
सध्याच्या परिस्थीतीचा बळीराजाच्या राज्यशी तुलना केली तर बळीराजा हा शेतक-याचा कैवारी होता, सर्वाना समानतेची वागणूक देणारा होता,न्यायप्रिय होता,गोरगरीबांचा कैवारी होता,अर्धमकरणाराचा कर्दनकाळ होता,प्रजा हित जपनारा होता या सर्व गोष्टी सध्याच्या राजकत्र्याकडे आहेत का ? हा संशोधनाचा विषय होईल इतकी नितीभ्रष्ट विकृती या सत्ताधा-यात निर्माण झाली आहे कि काय असा प्रश्न पडतो.ह्या माजलेल्या सत्ताधा-याच्या डोक्यात दिवाळीचा बळीराजारूपी प्रकाश पडो,बळीराजावरची इडा पीडा टळू दे व पुन्हा बळीचे राज्य येऊ दे ...!
comments